वास्तुशास्त्रानुसार अग्नी, वायू आणि जल यांच्या दिशा आहेत. वास्तूनुसार असे मानले जाते की या घटकांशी संबंधित वस्तू घरामध्ये योग्य दिशेने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यामुळे वास्तुदोष होऊ शकतात आणि घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढू शकतो. त्याचप्रमाणे घरामध्ये पाण्याची टाकी योग्य दिशेला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाण्याची टाकी चुकीच्या दिशेला ठेवल्याने धनहानीसोबतच अनेक आजार होऊ शकतात. जाणून घ्या पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवावी आणि कोणत्या दिशेला ठेवू नये.