सनसेट पॉइंट, कन्याकुमारी: दक्षिणभारतातील पर्यटकांंची सर्वात जास्त पसंती ही कन्याकुमारी या ठिकाणाला असते. तुम्हाला सूर्यास्त अनुभवायचा असेल तर सनसेट पॉइंटला नक्की भेट द्या. या सनसेट पॉइंटच्या जवळ बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांचा होणारा संगम पाहण्यास सूर्यास्ताच्यावेळी निसर्गप्रेमी जगाच्या कानाकोपऱ्यातून भेट देण्यास येतात.
कच्छ, गुजरात : कच्छमध्ये भारत पाकीस्तान सीमेलगत असलेल्या या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची कायमच पसंती असते. हा ठिकाणाहून सूर्यास्त पाहणं ही पर्यटकांसाठी पर्वणी असते.
गंगा घाट,वाराणसी: हिंदू धर्मात गंगा घाटाला पवित्र स्थान आहे. त्यामुळे भाविक कायम ठिकाणी येत असतात. मात्र गंगेचा घाट धार्मिक दृष्ट्या जितका पवित्र आहे तेवढंच त्याचं सौंदर्य देखील मनमोहक आहे. मावळतीला या ठिकाणी पर्यटक बोटींग साठी जातात. संध्याकाळची सुटणारी गार हवा, आणि गंगेचा घाट पाहण्यासाठी निसर्गप्रेमी कायम पसंती देतात.
टायगर हिल, पश्चिम बंगाल : दार्जिलींग हा टायगर हिल जगभरातल्या पर्यचकांंच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. पांढऱ्याशुभ्र कड्यावरुन सूर्यास्त पाहणं पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
रायगड : छत्रपतीशिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाला पराक्रमाचा वारसा जसा आहे तसंच त्याचं सौंदर्य देखील पाहणाऱ्याला भूरळ घालते. रायगडावरुन सूर्यास्त पाहण्याचा अनुभव कमाल असतो.