
मुलं जर सतत चिडतिड करत असतील दिवसेंदिवस रागीट होत असतील तर पालकांनी यावर वेळीच दखल घेणं गरजेचं आहे. केरींग आई या इन्स्टापेजवरुन मुलांच्या रागीट स्वभावावर पालकांनी काय करावं याबाबत एक छोटीशी गोष्ट सांगितली आहे जी तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता.
गोष्ट अशी की, एका शांत दुपारी, कैलाश पर्वतावर लहान गणेशजी अंगणात बसले होते. त्यांच्या हातात मऊ माती होती. त्यांनी त्या मातीपासून खेळणी बनवायला सुरुवात केली.सुरुवातीला त्यांनी एक छोटा हत्ती बनवला, मग लहान सिंह, झाडं, झोपड्या, अगदी छोटे पर्वतसुद्धा! संपूर्ण अंगण मातीच्या जादूच्या दुनियेत बदललं होतं.आई पार्वती दूरून हे सगळं पाहत होत्या आणि आपल्या मुलाच्या आनंदावर हसत होत्या. पण अचानक एक हत्ती हातातून पडला आणि तो मोडला! गणेशजीला खूप राग आला.“माझी खेळणी बिघडली!” त्यांनी रागाने ओरडाओरडा केला.रागाच्या भरात त्यांनी दुसरं खेळणं तोडलं मग तिसरं आणि थोड्याच वेळात सगळी सुंदर खेळणी मोडली गेली.
तेव्हा आई पार्वती धावत आल्या. त्यांनी हळूवारपणे गणेशजीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या “बाळा, पाहिलंस का? राग आल्यावर सगळं नष्ट होतं. रागामुळे आपण आपल्याला आवडणारं गमावतो.”गणेशजीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी विचारलं,“आई, पण पुन्हा काही तुटलं तर?”आई पार्वती हसल्या आणि म्हणाल्या, “मग तू पुन्हा बनवशील, या वेळेस अजून सुंदर बनवशील.रागात काही मिळत नाही, पण संयम ठेवला की आनंद मिळतो.”गणेशजीचा राग शांत झाला. त्यांनी पुन्हा माती हातात घेतली आणि हळूवारपणे खेळणी बनवायला सुरुवात केली.थोड्याच वेळात अंगण पुन्हा सुंदर खेळण्यांनी भरलं,आधीपेक्षा अजून सुंदर! त्या दिवशी गणेशजीने एक मोठं धडा शिकला,“राग सगळं तोडतो, पण संयम सगळं जोडून ठेवतो.”
या गणेशकथेतून मुलांनी काय शिकावं:
1. रागात काही फोडल्यास आपण फक्त आपलेच नुकसान करतो.
2. संयम आणि कल्पकतेने आपण चुका सुधारू शकतो.
3. राग येणं ठीक आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवायला शिकणं महत्त्वाचं आहे. गणपतीची ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना सांगितली तर त्यांचा राग कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
Ans: लहान मुलांना भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत. चिडचिड, राग, निराशा किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते खेळणी मोडून भावना व्यक्त करतात.
Ans: हो, मुलं वारंवार रागावून वस्तू फोडत असतील तर त्यांची भावनात्मक नियंत्रण क्षमता कमी होत असल्याचे संकेत असू शकतात. पालकांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं.
Ans: “राग सगळं तोडतो, पण संयम सगळं जोडून ठेवतो.” हा संदेश मुलांच्या मनात सकारात्मकता आणि समज निर्माण करतो.