जेवणासोबत पाणी पिण्याचे दुष्परिणाम
मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, पाणी, निवारा या चार मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. अन्न आणि पाण्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. शरीराला लागलेली भूक भागवण्यासाठी अन्नाचे सेवन करावे लागते तर तहान भागवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे लागते. पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण पाणी शरीराला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते. दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्याल्यामुळे पोट स्वच्छ राहून पचनक्रिया बिघडत नाही. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात दुखणे, पिंपल्स येणे, आम्लपित्त, गॅस, अपचन, पोट फुगणे, छातीत जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पाण्याचे भरपूर सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: छातीमध्ये जमा झालेल्या कफाने त्रस्त आहात? मग ‘या’ मसाल्यांचे करा सेवन
काहींना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण जेवल्यानंतर पाणी पिणे खरच आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. पण जेवणाच्या 30 मिनिटांनंतर पाणी पिल्यास जेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर पाणी प्यावे की नाही? यावर सद्गुरूंनी सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितल्यानुसार, जेवणात पाण्याचे सेवन करू नये. कारण पोटात ऍसिड डायल्यूट होते ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे हा पदार्थ पचनक्रियेसाठी असिड प्रमाण आहे. डायल्यूट झाल्यामुळे शरीराची संपूर्ण प्रक्रिया खराब होण्याची शक्यता असते. ज्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे जेवल्यानंतर थोड्यावेळाने पाणी प्यावे.
हे देखील वाचा: हार्ट ब्लॉकेजेस होण्याआधी शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सद्गुरूनी सांगितलेल्या गोष्टींचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यांनी शरीराचे शास्त्र सांगून आपले मत मांडले आहे. जेवण जेवल्यानंतर ते अन्ननलिकेतून जाते आणि पोटामध्ये पोहचते. पोटात अन्न गेल्यानंतर आम्ल रस अन्नाचे पचन करतो. त्यामुळे पोटात असलेल्या पाण्याचा शरीरावर कोणताच परिणाम होत नाही. पण जर पोटात पाणी असेल तर अन्नपदार्थ २० मिनिटांमध्ये शोषले जातात.