सर्दी खोकला झाल्यानंतर छातीमध्ये कफ सुकून जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छातीत सुकलेला कफ कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक मसाल्यांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. यामुळे शरीराला फायदे होतील. (फोटो सौजन्य-istock)
छातीमधील कफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय
सतत घसा खवखवत असेल तर घरी तुम्ही सुंठवडा बनवून खाऊ शकता. यामुळे घशातील खवखव कमी होण्यास मदत होईल. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात.
सर्दी, खोकला किंवा कफ झाल्यानंतर दालचिनीच्या पावडरचे सेवन करावे. दालचिनी खाल्यामुळे घश्यातील जळजळ कमी होण्यास मदत होते. नियमित दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
छातीमधील कफासाठी हळद अतिशय प्रभावी आहे. हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कफ काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे हळद आणि मध मिक्स करून खाल्यास कफ कमी होईल.
खोकला किंवा कफ झाल्यानंतर पिंपळी उगळून चाटण बनवले जाते. हे नियमित खाल्ल्यास सर्दी खोकला कमी होण्यास मदत होईल. पिंपळी पावडरमध्ये मध मिक्स करून खावे.
आयुर्वेदामध्ये मधाला अमृताची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अँटिबायोटिक्स घेण्यापेक्षा मधाचे सेवन करावे. मध खाल्यामुळे कफ कमी होऊन आराम मिळतो.