Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम

Dry skin: हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते.
Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम
Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम
Published on: 
Updated on: 
  • थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडण्याची कारणे?

  • ओठ मऊ राहण्यासाठी काय करावे?

  • त्वचेवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय?

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. वातावरणातील दमटपणा त्वचा पूर्णपणे कोरडी करून टाकतो. याशिवाय शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे चेहऱ्यासोबतच ओठ, हातापायांची त्वचा सुद्धा खूप जास्त कोरडी होऊन जाते. याशिवाय काहींच्या त्वचेवर पांढरा थर दिसू लागतो आणि त्वचेवर खूप जास्त खाज येते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ताणल्यासारखी वाटणे किंवा भेगा पडण्याचा त्रास होऊ शकतो. त्वचा कोरडी झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहण्यास मदत होते आणि त्वचा हायड्रेट राहते. (फोटो सौजन्य – istock)

खोबरेल तेल:

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी खोबरेल तेल त्वचेवर लावावे. अंघोळ केल्यानंतर शरीरावर खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचा मऊ होईल. तसेच फाटलेल्या ओठांवर, पायांवर खोबरेल तेल लावावे. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होते. पण ज्यांची त्वचा खूप जास्त तेलकट असेल अशांनी चेहऱ्यावर तेल लावू नये.

कोरफड जेल:

कोरफड जेल त्वचा शांत आणि थंड करण्यास मदत करते. शुद्ध आणि सुगंधविरहित कोरफड जेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि फ्रेश राहते. कोरडेपणा आणि ताणल्यासारखे वाटणे कमी होऊन जाते. पण कोणतेही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करून पाहणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचेवर जळजळ किंवा पिंपल्स येऊ शकतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा त्वचेवर तुम्ही कोरफड जेल लावू शकता.

दुधाची साय:

प्रत्येक स्वयंपाक घरात दुधाचा वापर आवर्जून केला जातो. दुधाच्या वापरामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर दुधाची साय लावल्यास त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. पण अतिसंवेदनशील किंवा खूप जास्त मुरूम असलेल्या त्वचेवर दुधाची साय लावल्यास चेहऱ्यावर मुरूम येऊ शकतात. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

कोरड्या ओठांना तूप लावावे:

आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेले तूप त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तुपात असलेले गुणकारी घटक त्वचेवरील कोरडेपणा आणि काळा थर कमी करून त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ओठांवर सुगंधविरहित लिप बाम लावावे. हानिकारक केमिकल असलेले लिपबाम लावल्यामुळे ओठांवर डेड स्किन जमा होण्याची शक्यता असते.