मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा मास्क
Home Remedies: सुंदर दिसण्यासाठी कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. नेहमीच फेसवॉश, फेस सीरम, फेसपॅक इत्यादी अनेक गोष्टींचा वापर त्वचेसाठी कायमच केला जातो. पण मानेवर वाढलेल्या टॅनिंगकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. काहींचा चेहरा अतिशय उजळदार दिसतो, पण मान खूप जास्त काळी दिसू लागते. मानेवर वाढलेले टॅनिंग संपूर्ण लुक खराब करून टाकते. त्यामुळे मानेवर वाढलेल्या टॅनिंगकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. याशिवाय शरीरात होणारे हार्मोनल बदल, रक्तात वाढलेली साखर इत्यादी अनेक कारणामुळे सुद्धा मानेवर टॅनिंग वाढू शकते.(फोटो सौजन्य – istock)
मानेच्या घड्यांमध्ये घाम, धूळ आणि मृत त्वचापेशी साचून राहिल्यामुळे त्वचा अस्वच्छ दिसू लागते. यासाठी महागड्या ट्रीटमेंट तर काहीवेळा स्किन केअरमध्ये सुद्धा बदल केला जातो. पण वारंवार महागड्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. आज आम्ही तुम्हाला मानेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सोपा मास्क बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मास्क त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यासोबतच त्वचा उजळदार करेल.
मानेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सगळ्यात आधी फेसवॉश करताना मान सुद्धा स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. कारण मानेवर घामाचा किंवा धुळीचा चिकट थर जमा होऊन राहतो. अनेक महिला लिंबू, बेकिंग सोडा किंवा खडबडीत स्क्रब वापरून मानेवर वाढलेला काळेपणा कमी करतात, पण यामुळे त्वचेमध्ये जळजळ होण्याची जास्त शक्यता असते. त्वचा काळी झाल्यानंतर जास्त घासून काढल्यास त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही मास्क किंवा स्क्रब लावल्यास त्वचा घासू नये.
मानेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्याआधी मानेवर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय त्वचा कोरडी पडू शकते. सुगंधविरहित आणि संवेदनशील त्वचेसाठी योग्य असलेले मॉइश्चरायझर निवडणे फार आवश्यक आहे. मान आणि मानेच्या मागील भागाकडे दुर्लक्ष करू नये. याशिवाय बाहेर पडण्यापूर्वी मानेवरही SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे.
स्कार्फ किंवा कॉलर असलेले कपडे वापरुनही मानेचे उन्हापासून संरक्षण करावे. त्वचेवर वाढलेला काळेपणा करण्यासाठी नियासिनामाइड किंवा अॅझेलाइक अॅसिड असलेली स्किन केअर प्रॉडक्ट वापरावीत. प्रॉडक्टचा वापर करताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये हळूहळू वापर करावा. त्यानंतरच नियमित प्रॉडक्ट वापरावे. कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
Ans: सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळे मानेच्या त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. तसेच घर्षण आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानेही त्वचेचा रंग असमान दिसू शकतो.
Ans: बेसन, दही आणि कोरफड यांसारख्या पदार्थांचा वापर करून सौम्य मास्क तयार करता येतो. मात्र, यामुळे टॅनिंग पूर्णपणे दूर होते याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
Ans: बेसनात थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा. ती मानेवर लावून काही मिनिटांनी पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्वचेला त्रास झाल्यास वापर थांबवा.






