फेशिअल करण्याची सोपी पद्धत
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला नैसर्गिक उपाय करण्याऐवजी केमिकल ट्रीटमेंट करण्यास जास्त प्राधान्य देतात. केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा काही काळ खूप सुंदर आणि प्रभावी दिसते, मात्र काही दिवसानानंतर पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा कायम टवटवीत आणि सुंदर राहते. त्वचेवरील नैसर्गिक सौदंर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी शरीराला आतून पोषण देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे त्वचेची वरून काळजी घेतली जाते तशीच काळजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करून घेतली तर त्वचा अजून सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल.
दिवाळी सणाची सगळीकडे मोठी लगबग सुरु आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला बाजारात जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात.पण काहीवेळ फेशिअलचा ग्लो जास्त दिवस चेहऱ्यावर टिकून राहत नाही. त्यामुळे बाजारात मिळणारे महागडे फेशिअल करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही 10 मिनिटांमध्ये फेशिअल करू शकता.यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल.चला तर जाणून घेऊया फेशिअल करण्याची पद्धत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चरबीमुळे चेहरा फुग्यासारखा गुबगुबीत झालाय? मग या पदार्थांचे सेवन करा, रातोरात चरबी होईल कमी
फेशिअल करताना सगळ्यात आधी त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होते. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी सर्वप्रथम, तांदळाच्या पिठामध्ये दुधाची शाई मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होईल. तांदळाचे पीठ आणि मलाई त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे.
फेशिअल करताना त्वचेवर मसाज करणे सुद्धा आवश्यक आहे. मसाज केल्यामुळे चेहऱ्याचे रक्तभिसरण व्यवस्थित होते. यासाठी वाटीमध्ये दुधाची मलाई घेऊन त्यात चिमूटभर हळद, बेसन टाकून जाडसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या. काहीवेळ मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहून चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल.
हे देखील वाचा: चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने होते नुकसान?
तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचेवर फेसपॅक लावा. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होईल. फेसपॅक तयार करताना वाटीमध्ये दुधाची साय घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक त्वचेवर काहीवेळ लावून ठेवा. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.फेशिअल केल्यामुळे सनबर्न, पिंपल्स, बंद पोर्स, सुरकुत्या निघून जातील.