बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर परिणाम होत असतो. आजकाल अनेकजण लठ्ठपणा, चरबी वाढणे यांसारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. वजन वाढले की चेहऱ्यावरची चरबी देखील वाढू लागते आणि परिणामी चेहरा गुबगुबीत दिसू लागतो. अशात आपला अनेकजण आपली खिल्ली उडवू लागतात. अनेकदा वजन कमी झाले तरी चेहऱ्यावरची चरबी काही कमी होत नाही. आपल्या फुगलेल्या चेहऱ्याकडे पाहून अनेकजदा आपल्यालाच स्वतःला आरशामध्ये पाहणे कठीण होऊन बसते.
अनेकजण चेहऱ्यावरील ही चरबी कमी करण्यासाठी वेगवगेळे उपाय आणि प्रोडक्टसचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाकघरातील काही निवडक पदार्थांच्या सेवनाने तुम्ही चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी अगदी काही दिवसांतच कमी करू शकता. चला तर मग यात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – या हिरव्या भाजीपासून बनवा नॅचरल कंडिशनर, काही मिनिटांतच केस होतील स्मूद आणि चमकदार
मेथीचे दाणे
मेथी दाणे हे आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा एक सामान्य घटक आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकून चेहऱ्यावरील सूज आणि चरबी कमी होते. याचे सेवन आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. यासाठी रात्री पाण्यात मेथीचे दाणे भिजवा आणि मग सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील चरबी दूर होण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – घरात सतत बडबड पण चारचौघात गप्प बसतात मुलं? मग हे उपाय करतील मदत, वाढवतील आत्मविश्वास
लिंबू
घराघरात उपलब्ध असणारा लिंबू चेहऱ्यावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यास तुमची मदत करेल. लिंबू शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. हा एक उत्तम डिटॉक्स उपाय आहे, जो चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून याचे सेवन करा. यामुळे पोट साफ होईल तसेच चेहऱ्यावरची चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
आल्याचा रस
आलं हे अनेक आजार दूर करण्यासाठीचा एक रामबाण उपाय आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास याची फार मदत होते. यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते सूज कमी करतं आणि चेहऱ्याला स्लिमिंग लुक देते. यासाठी रोज सकाळी आलं पाण्यात उकळून मग गाळून या आल्याच्या पाण्यचे सेवन करत जा. याच्या नियमित सेवनाने निश्चितच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बदल झालेले जाणवतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.