Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

Health: अंडी हा प्रथिने आणि विविध पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे. रोज अंडी खाल्ल्याने स्नायूंची वाढ, मेंदूचे आरोग्य, डोळ्यांची काळजी, हाडांची मजबुती आणि वजन नियंत्रणासाठी मदत होऊ शकते. जाणून घ्या अंड्यांमधील ७ महत्त्वाचे फायदे आणि दररोज किती अंडी खाणे योग्य आहे.
Eating eggs daily offers these 7 health benefits; learn about the importance of the nutrients(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Eating eggs daily offers these 7 health benefits; learn about the importance of the nutrients(फोटो सौजन्य - सोशल मीडिया) Eating eggs daily offers these 7 health benefits; learn about the importance of the nutrients(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी12, डी, कोलीन आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

  • अंड्यांचे सेवन स्नायूंची वाढ, मेंदूचे कार्य, डोळ्यांचे आरोग्य, हाडांची मजबुती आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • अंडी नेहमी पूर्णपणे शिजवून खावीत. दररोज किती अंडी खावीत हे ठरवताना वैयक्तिक आरोग्यस्थिती आणि आहाराच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अंडी हा आपल्या आहारातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक मानला जातो.तसेच डॉक्टर उपाय सांगतात आहारात अंडी खाण्याचे प्रमाण वाढावा असे सांगतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकजण उकडलेली अंडी, ऑम्लेट किंवा अंड्याचे विविध पदार्थ खाणे पसंत करतात. अंड्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, कोलीन, सेलेनियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे अंड्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. विशेष म्हणजे अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा बलक या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात.त्यामुळे खाताना तुमच्या शरीराला ज्या भागाची जास्त गरज असेल त्याचा आहार घ्या. जाणून घेऊया रोज अंडी खाण्याचे सात महत्त्वाचे फायदे.

१. स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर असते.

अंड्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. त्यामुळे ज्याव्यक्तीचे स्नायू कमजोर असतील त्यांच्या साठी अंडी ही प्रथिने स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्ती आणि फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी अंडी हा उत्तम आहार पर्याय आहे.त्यामुळे तुमच्या स्नायूंना ताकद मिळेल.

२. मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

अंड्यामध्ये कोलीन नावाचे महत्त्वाचे पोषक तत्त्व असते. हे मेंदूच्या कार्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.तसेच रोज खाण्याने मेंदूची लवकर वाढ होण्यास मदत होईल.

३. डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झियाझँथिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात.ह्या घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य हे उत्तम राहते. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अंडी उपयुक्त ठरू शकतात.

Eating eggs daily offers these 7 health benefits; learn about the importance of the nutrients(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

४. हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.

अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते.जे आपल्या हाडांच्या वाढीसाठी गरजेचेचे असते. हाडे ठिसूळ होण्यापासून रक्षण होते हे शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यास मदत करते. त्यामुळे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी अंडी उपयुक्त ठरतात.

५. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

वाजन वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात आपल्या शरीरात प्रथिने जाणे महत्वाचे असते. अंड्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अंडी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी वारंवार भूक लागणे आणि अतिरिक्त खाणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

६. रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरते.

अंड्यामध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी12 यांसारखे पोषक घटक असतात.त्यामुळे दैनंदिन जीवनात होणाऱ्या आजारांपासून हे आपले बचाव करते. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आणि रोगप्रतिकारक यंत्रणेच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहेत.

७. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.

अंड्यामधील प्रथिने आणि बायोटिन यांसारखे पोषक घटक केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.अंडी खाल्ल्याने केस पांढरे होण्यापासून तसेच गाळण्यापासून कमी होतात. संतुलित आहारासोबत अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.

Eating eggs daily offers these 7 health benefits; learn about the importance of the nutrients(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

रोज किती अंडी खाल्ली पाहिजे ?

निरोगी प्रौढ व्यक्ती संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज एक पूर्ण अंडे खाऊ शकते. मात्र, प्रत्येकाची शारीरिक गरज आणि आरोग्यस्थिती वेगळी असते. कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंडी नेहमी पूर्णपणे शिजवून खावीत.त्याने विविध रोगांपासून बचाव होईलच तसेच आपले आरोग्य अधिकच तंदुरुस्त होईल. अशा प्रकारे अंडी हा प्रथिने आणि विविध पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून अंडी खाल्ल्यास आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.