Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांनी सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करण्याचा तज्ज्ञांचा इशारा

दहीहंडीचा उत्सव मुंबईत मोठ्या जोमात साजरा होतो. मात्र यावेळी अनेक गोविंदा पथकामधील गोविंदांना पडण्याचा धोकाही असतो. वरच्या स्तरावरील गोविंदाने हेल्मेट घालणे गरजेचे आहे असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. यावर्षी गोविंदासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून तुम्ही हे वाचाच

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 23, 2024 | 02:57 PM
दही हंडी

दही हंडी

Follow Us
Close
Follow Us:

गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी गोविंदा पथकाचा उत्साह शिगेला पोहचत असतो. दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचताना अनेक अपघात होतात. अशावेळी डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, गुडघा तसेच कोपरावर पॅड, मनगटावर संरक्षणात्मक बॅंड वापरणे त्याचबरोबर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणे हे दुखापतींचा धोका कमी करण्यास मदत करते.

योग्य खबरदारी न घेतल्यास भर गंभीर दुखापतींमुळे अंथरुणास खिळून रहावे लागू शकते अथवा कायमचे अपंगत्व येऊ शकते तर, गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील ओढावू शकतो. अपघातामुळे दीर्घकालीन दुखापत होण्याचा धोका आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

गोविंदांना अनावश्यक धोका 

गोविंदा पथकाला असणारा धोका

संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी, असंख्य गोविंदा आणि सहभागींना फ्रॅक्चर आणि मेंदूच्या दुखापतींचा सामना करावा लागतो. 2023 मध्ये, मुंबईत दहीहंडी उत्सवाशी संबंधित 200 हून अधिक जखमी आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे. स्पर्धेच्या चढाओढीत सततच्या दबावामुळे सहभागी गोविंदाना अनावश्यक धोका पत्करावा लागतो.

हेदेखील वाचा – 2023 मध्ये राज्यभरात दहीहंडी उत्साहात; पण 107 गोविंदा जखमी, मुंबईतील संख्या सर्वाधिक

तज्ज्ञांचा सल्ला 

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आलोक पांडे म्हणाले की, दहीहंडीच्या सणाच्या उत्साहात ऑर्थोपेडिक दुखापती विशेषत: गोविंदांना फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करणे आणि हंडी फोडण्यासाठी सहजतेने उंचच्या उच थर रचले जातात. यामुळे फ्रॅक्चर, पायास गंभीर दुखापत, खांद्याचे सांधे निखळणे किंवा ओटीपोटासंबंधीत फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि टेंडिनाइटिस आणि तसेच किरकोळ दुखापत आणि अथवा ताण येऊ शकतो.  

अपघाताने त्रास 

अपघातामुळे मनगट, घोटा, कोपर, नितंब, गुडघा आणि हात यांना दीर्घकालीन दुखापत होण्याचा धोका असतो. हंडी फोडण्याचा प्रयत्न करताना अनेकदा गोविंदाच्या मनगटावर अतिरिक्त ताण येतो. गोविंदांनी सेफ्टी गियर वापरणे आणि वॉर्मअप करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. घटनास्थळी वैद्यकीय पथक उपस्थित असल्यास गोविंदांना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळतील.

मेंदूस गंभीर धोका 

वरच्या स्तरावरून पडल्यास मेंदूला मार बसण्याची भीती

लिलावती रूग्णालयात न्यूरोलॉजिस्ट डॉ. गिरीश सोनी म्हणाले की, दहीहंडी उत्सवादरम्यान थर रचताना पडल्याने गोविंदांच्या मेंदूला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. मानवी मनोरे तयार करण्याचा प्रयत्न करताना उंचावरून खाली पडणे आणि धातूचे खांब किंवा कठीण पृष्ठभाग यासारख्या जड वस्तूंवर आदळल्याने मेंदूस गंभीचा धोका होऊ शकतो. 

आघाताने आयुष्य उद्ध्वस्त 

या अचानक झालेल्या आघात किंवा तुमच्या डोक्याला झालेल्या दुखापतींमुळे कमकुवतपणा, समन्वय साधण्यात अडचणी येणे, अशक्तपणा, अर्धांगवायू, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD),  मेंदूचे विकार, अपस्मार, मायग्रेन, रक्ताच्या गुठळ्या, मज्जातंतूंचे नुकसान अशा गुंतागुंत होऊ शकतात. या गंभीर गुंतागुंत त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. 

या अपघातामुळे खाणे, चालणे किंवा शौचालय वापरणे यासारखी मूलभूत कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून रहावे लागते. हे जोखमीचे घटक कमी करण्यासाठी गोविंदांना सणासुदीच्या वातावरणाचा आनंद घेताना त्यांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. डोक्यावर हेल्मेट किंवा गुडघ्याच्या संरक्षणासाठी पॅड घालणे, पुरेशी विश्रांती घेणे, नियमितपणे स्ट्रेचिंग करणे, योग्य तंत्रांचा सराव करणे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.

Web Title: Experts warn govinda participating in dahi handi festival to use helmet for safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Govinda

संबंधित बातम्या

तो सोनाली बेंद्रे वगळता प्रत्येक नायिकेसोबत करायचा फ्लर्ट…सुनीताने नॅशनल TVवर सांगितलं गोविंदाचे गुपित
1

तो सोनाली बेंद्रे वगळता प्रत्येक नायिकेसोबत करायचा फ्लर्ट…सुनीताने नॅशनल TVवर सांगितलं गोविंदाचे गुपित

गणपती बाप्पा मोरया! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान सुनीता- गोविंदा पुन्हा एकत्र, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
2

गणपती बाप्पा मोरया! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान सुनीता- गोविंदा पुन्हा एकत्र, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल, जाणून घ्या सत्यता
3

गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल, जाणून घ्या सत्यता

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप
4

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.