Piercing केल्यानंतर कानाची किंवा नाकाची जखम लवकर भरून येण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Piercing: कान किंवा नाक टोचल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यास सूज, लालसरपणा आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. पिअर्सिंगची जखम लवकर भरून येण्यासाठी स्वच्छता कशी राखावी, कोणत्या धातूचे दागिने वापरावेत आणि कान टोचण्यासाठी कोणता काळ योग्य असतो, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स.
Follow these special tips to help your ear or nose piercing heal faster!( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Follow these special tips to help your ear or nose piercing heal faster!( फोटो सौजन्य - सोशल मीडिया) Follow these special tips to help your ear or nose piercing heal faster!( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

कान टोचल्या नंतर काळजी कशी घ्यावी?

कान कोणत्या धातू ने टोचावा?

कान कोणत्या काळात टोचावा?

आजकाल कान आणि नाक टोचण्याचा (Piercing) ट्रेंड तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.विविध प्रकारचे piercing करण्याचे ट्रेंड बाजारात आलेला आहे. पण कां किंवा नाक टोचलत्या नंतर त्याची काळजी कशी घ्यावी हे बरेच जणांना माहिती नसते. त्यामुळे जखम वाढत जाते. त्यानंतर piercing काढावे देखील लागू शकते. अनेकजणी फॅशन आणि सौंदर्याचा भाग म्हणून कानात किंवा नाकात पिअर्सिंग करून घेतात. मात्र, पिअर्सिंग केल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यास त्या ठिकाणी सूज, लालसरपणा, वेदना किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिअर्सिंग केल्यानंतर जखम लवकर भरून येण्यासाठी स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

१. पिअर्सिंगची जागा स्वच्छ ठेवा

पिअर्सिंग केलेल्या जागेची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दिवसातून दोन वेळा स्टेराइल सलाईन सोल्युशनने (Sterile Saline Solution) जे तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये सापडेल,ती जागा हलक्या हाताने स्वच्छ करा. स्वच्छता करण्यापूर्वी हात साबणाने धुवा. यामुळे जंतुसंसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.कानभोवती फोड देखील येणार नाही.

२. वारंवार दागिन्यांना हात लावू नका.

पिअर्सिंग केल्यानंतर अनेकजणी वारंवार कानातील किंवा नाकातील दागिना फिरवतात. मात्र, असे करणे टाळावे. वारंवार दागिन्यांना हात लावल्याने जखमेला त्रास होऊ शकतो आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पिअर्सिंग पूर्णपणे बरे होईपर्यंत दागिना स्वतःहून काढू नका.

३. योग्य दागिन्यांची निवड करा.

पिअर्सिंग करताना आणि त्यानंतर योग्य दर्जाचे दागिने वापरणे महत्त्वाचे आहे. टायटॅनियम, निकेलमुक्त सोन्यासारखे शरीराला अनुकूल साहित्य निवडा. निकेल असलेल्या दागिन्यांमुळे काही व्यक्तींना ॲलर्जी, खाज आणि लालसरपणा जाणवू शकतो. चांदीच्या दागिन्यांनी कां किंवा नाक टोचणं टाळा.

४. केमिकलयुक्त उत्पादने वापरणे टाळा.

पिअर्सिंग केलेल्या जागेवर परफ्यूम, हेअर स्प्रे, मेकअप, अल्कोहोल किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड लावू नका. यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते आणि जखम भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

४. केमिकलयुक्त उत्पादने वापरणे टाळा.

पिअर्सिंग केलेल्या जागेवर परफ्यूम, हेअर स्प्रे, मेकअप, अल्कोहोल किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड लावू नका. यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते आणि जखम भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

५. झोपताना विशेष काळजी घ्या.

कानाचे पिअर्सिंग केले असल्यास त्या बाजूला झोपणे टाळा. झोपताना होणाऱ्या घर्षणामुळे वेदना आणि सूज वाढू शकते. तसेच उशीचे कव्हर नियमितपणे स्वच्छ ठेवा.त्याबरोबर neck pillow चा वापर करा. ज्यामुळे तुमच्या piercing ला कोणत्याही प्रकारचे घर्षण होणार नाही असे पहा.

संसर्गाची लक्षणे ओळखा.

पिअर्सिंग केलेल्या जागी वाढती सूज, तीव्र वेदना, जास्त लालसरपणा, गरमपणा, पू किंवा ताप जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. संसर्गाची शंका असल्यास दागिना स्वतःहून काढू नका; डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील उपचार करा.

कोणत्या काळात कान टोचणे योग्य असते?

कान टोचण्यासाठी हवामानाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. साधारणपणे थंड आणि कोरड्या हवामानात कान टोचणे सोयीचे ठरू शकते. कारण उन्हाळ्यात घामामुळे पिअर्सिंग केलेल्या जागी ओलावा निर्माण होऊन जळजळ किंवा संसर्गाचा धोका वाढू शकतो. मात्र, पावसाळ्यातही ओलावा आणि अस्वच्छतेमुळे काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे हिवाळा किंवा कमी उष्णतेचा काळ कान टोचण्यासाठी निवडू शकता. विशेष म्हणजे, कान टोचण्यासाठी कोणताही एक ऋतू वैद्यकीयदृष्ट्या सर्वोत्तम असल्याचे ठोस पुरावे नाहीत. स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने कान टोचणे अधिक महत्त्वाचे आहे.

महत्त्वाची टीप: पिअर्सिंग पूर्णपणे बरे होण्यासाठी लागणारा कालावधी जागेनुसार वेगळा असतो. कानाच्या पाळीला साधारण ६ ते ८ आठवडे लागू शकतात, तर कानाच्या कूर्चेला (Cartilage) आणि नाकाच्या पिअर्सिंगला अनेक महिने लागू शकतात. त्यामुळे घाई न करता योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.