
फोटो सौजन्य - Social Media
खांडवी गुजरात राज्यातील अतिशय स्वादिष्ट असा नाश्ता आहे. हा नास्ता मुखतः लहान मुलांना खूप आवडतो. लहान मुलांपासून ते अगदी प्रौढ लोकांपर्यंत माणसे या नाश्त्याचा आस्वाद अगदी मजेने घेतात. तुम्ही देखील या नाश्त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. तुमच्या घरातील लहान मुलांना हि रेसिपी नक्कीच आवडणार आहे. गुजरात मधील पारंपारिक असणारी खांडवी सगळ्यांच्या तोंडाला आपसूक पाणी आणते. हा मजेशीर नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी हे लेख शेवटपर्यत नक्की वाचा.
हे देखील वाचा : व्हिटॅमिनच्या गोळ्या रोज घेणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर? जाणून घ्या
साहित्य:
कृती :
एका बाऊलमध्ये बेसन, दही, अद्रक-हिरवी मिरची पेस्ट, हळद, हिंग, लिंबाचा रस, मीठ आणि 2 कप पाणी एकत्र करा. या मिश्रणाला गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित फेटून घ्या. हे तयार झालेले मिश्रण एका गॅसवर ठेवा आणि मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, साधारण 10-12 मिनिटं लागतील. मिश्रण शिजले की ते कडा सोडायला लागेल, याचा अर्थ खांडवीचं मिश्रण तयार आहे.
शिजलेलं मिश्रण तातडीने थाळी किंवा मोठ्या प्लेटवर पातळ थरात पसरवा. यासाठी तुम्ही चमचा किंवा पळी वापरू शकता. मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर, सुरीने लांबट आकाराच्या पट्ट्या कापा. त्या पट्ट्यांना हळुवारपणे रोल करा आणि तयार रोल्स एका ताटात सजवा. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करा. त्यात राई घाला. राई तडतडली की त्यात हिंग, कढीपत्ता, आणि हिरवी मिरची घाला. ही फोडणी खांडवीच्या रोल्सवर टाका. खांडवीच्या रोल्सवर थोडीशी किसलेली नारळ आणि कोथिंबीर घाला, जेणेकरून खांडवी अधिक आकर्षक आणि चवदार बनेल.
आता तुमची खांडवी तयार आहे. हा नाश्ता गरमागरम चहा किंवा चटणीसोबत सर्व्ह करा आणि खांडवीचा आनंद घ्या.