फोटो सौजन्य: Freepik
सध्याच्या बदलत्या वातावरणात निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी नियमिय व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. काही जण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थ समाविष्ट करत असतात तर काही वेळेअभावी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेणे पसंत करतात.
शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, बरेच लोक दररोज व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असतात. असे मानले जाते की व्हिटॅमिन्स शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्वाचे असते. आपल्या शरीराला १३ प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. प्रत्येक व्हिटॅमिनचे आपल्या शरीराववर वेगवेगळे फायदे असतात.
शरीराला किती व्हिटॅमिन्सची गरज असते?
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन्स आणि खनिजे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, परंतु शरीराला वय, आरोग्य आणि स्थितीनुसार त्यांची आवश्यकता भासत असते. व्हिटॅमिनची आवश्यकता देखील पुरुष आणि महिलांमध्ये भिन्न असू शकते. त्यामुळेच अनेक जण डॉक्टरच्या सल्ल्याने व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असतात.
व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याचे फायदे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरात कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात जमा झाली तर आजारही वाढतो. व्हिटॅमिनच्या ओव्हरडोजचे दुष्परिणाम वय आणि आरोग्यावर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे, यामुळे निद्रानाश, तणाव, नैराश्य, मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
व्हिटॅमिन डीच्या गोळ्या जास्त घेतल्यास एखादी व्यक्ती कोमातही जाऊ शकते. तसेच या गोळ्यांमुळे उलट्या, मळमळ, बद्धकोष्ठता, पोटाच्या तक्रारी, भूक न लागणे, गोंधळ यांसारखे त्रास होऊ शकतात.