Healthy Recipe: दिवसभर दिसाल उत्साही! मोड आलेल्या कडधान्यापासून बनवा 'हा' स्वादिष्ट पदार्थ
पावसाळा म्हटलं की चटपटीत आणि तळणीचे पदार्थ आलेच. या ऋतूत लोक अनहेल्दी फूडकडे अधिक आकर्षित होतात. यामुळे पौष्टिक पदार्थांकडे दुर्लक्ष केले जाते. सतत अनहेल्दी पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी आणि करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील एनर्जी वाढून मन दिवसभर उत्साही राहते आणि कामात लक्ष लागून राहते.
आज आम्ही तुमच्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठीची एक नवीन हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायद्याची ठरेल. आज आपण मोड आलेल्या कडधान्यापासून एक चविष्ट असा पराठा तयार करणार आहोत. हा पराठा चवीला अप्रतिम लागतो आणि याने दिवसभर पोट भरलेले राहते. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – lndependence Day 2024: यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हटक्या पद्धतीने साजरा करा, घरी बनवा तिरंगा बर्फी