how to make ice cream without fridge, Ice Cream Day , homemade ice cream recipe, food news, फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी
जगभर आईस्क्रीम प्रेमी पाहायला मिळतात. आईस्क्रीम एक असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडतो. केवळ उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आईस्क्रीम आवडीने खाल्ली जाते. काही लोक तर आजरी असतानाही आईस्क्रीम खाण्याची संधी चुकवत नाहीत. आजकाल आईस्क्रीमचे अनेक फ्लेवर्स आणि प्रकार बाजारात उपलब्ध असतात.
आईस्क्रीम घरीदेखील बनवली जाऊ शकते. इंटरनेटवर आईस्क्रीमच्या अनेक रेसिपी शेअर केल्या आहेत. मात्र तुम्ही अनेकदा ऐकले असेल की आईस्क्रीम बनवण्यासाठी फ्रिजची आवश्यकता असते. मुळात हा पदार्थ थंड असल्याकारणाने याला बनवण्यासाठी फ्रिज असणे फार गरजेचे आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, फ्रिजशिवायदेखील तुम्ही घरी थंड आईस्क्रीम अगदी सहज बनवू शकता.
फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवणे फार सोपे आहे आणि यासाठी तुम्हाला फार तामझामदेखील करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला काही सामानांची गरज आहे. जसे की दोन झिप लॉक पिशव्या, अर्धा कप सैंधव मीठ आणि काही बर्फाचे तुकडे. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हव्या त्या फ्लेवरची आईस्क्रीम तयार करू शकता. आज आम्ही यापासून मँगो आईस्क्रीम कशी तयार करायची याची रेसिपी सांगत आहोत.
हेदेखील वाचा – Ice Cream Sandwich: हटके रेसिपीने ‘आईस्क्रीम डे’ बनवा खास, नोट करा साहित्य आणि कृती
फ्रिजशिवाय आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही जी आईस्क्रीम तयार करत आहेत तीची तयारी करावी लागेल. इथे आपण मँगो आईस्क्रीम तयार करणार आहोत, त्यामुळे आधी त्यासाठीचे मिश्रण तयार करूयात. यासाठी सर्वप्रथम आंब्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात त्यात साखर, अर्धा कप दूध आणि चवीनुसार थोडी दुधाची साय किंवा क्रीम घाला. सर्व मिक्स करून बॅटर तयार करून घ्या.