कोथिंबीर वडी
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पदार्थ. कोथिंबीर प्रत्येक जेवणाची चव वाढवण्यासाठी भाजीत वापरली जाते. याच कोथिंबीरपासून बनवली जाणारी वडी चवीलाही फार छान आणि रुचकर लागते. याचे नुसते नाव जरी घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ही कोथिंबीर वडी विशेषतः उकडून आणि नंतर फ्राय करून खाण्यासाठी सर्व्ह केली जाते. हिची कुरकुरीत चव अनेकांना फार आवडते. आज आम्ही तुम्हाला न वाफवता आणि न तळता कोथिंबीर वादी कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी थोडी हटके स्टाइलमध्ये असणार आहे. याची चव बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी असेल. तुमची कोथींबीर वडी परफेक्ट बनत नसेल तर आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा.
ही रेसिपी @nehadeepakshah या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी तुमचे वजन कमी करण्यात मदत करेल, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.