
शिळ्या चपातीपासून झटपट बनवा मसाला पोळी, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी
आपल्या भारतीय संस्कृतीत आपण कधीही मोजून अन्न शिजवत नाही. कधी कोणाला काही कमी पडू नये या विचाराने गृहिणी नेहमीच अधिकचे जेवण शिजवतात. मात्र बऱ्याचदा हे अन्न जास्तीचे उरले की याचे काय करावे असा प्रश्न मनात घोघावत राहतो. यात चपाती सामान्य पदार्थ आहे जो दररोज आपल्या घरी बनवला जातो. आता अनेकांना शिळे अन्न पुन्हा खाण्याची इच्छा नसते मात्र अन्न फेकून द्यावेसेदेखील वाटतं नाही. अशात तुम्ही या उरलेल्या चपात्यांपासून एक नवीन पदार्थ तयार करू शकता.
आज आम्ही तुम्हाला उरलेल्या चपात्यांपासून स्वादिष्ट मसाला पोळी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि हिला तयार करण्यासाठी अधिक वेळही लागत नाही. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.