आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत जितके महत्तव ताटाच्या उजव्या बाजूला तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व डाव्या बाजूला असते. ताटाच्या उजव्या बाजूला पोळी, भाजी, वरण भात असे पदार्थ वाढले जातात तर डाव्या बाजूला पापड, लोणचं, चटणी असे जेवणाची चव द्विगुणित करणारे पदार्थ वाढले जातात. तुम्ही याआधी कैरीचे, लिंबाचे असे अनेक लोणचे खाल्ले असतील मात्र आज आम्ही तुमच्यासोबत पांढऱ्या कांद्यापासून तयार केल्या जाणाऱ्या चटकदार लोणच्याची रेसिपी शेअर करत आहोत.
पांढरा कांदा आपल्या आरोग्यसाठी फार फायद्याचा मानला जातो. त्यामुळे याचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा. एखाद्या सध्या जेवणाची चवही लोणच्याने वाढवली जाते. लोणचं जेवणात असलं की चार खास जास्तीचेच पोटात जातात. त्यात आजच्या या कांद्या लोणच्याची रेसिपी फार सोपी असून अगदी कमी वेळेत हे लोणचे बनून तयार होते. स्वादिष्ट आणि चटकेदार अशा कांद्याचे लोणच्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला काही हेल्दी होऊन जाऊद्यात! घरी बनवा टेस्टी मुगाची चाट