Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा

नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. या नऊ दिवसांत अनेकजण उपवास करत असतात. आता उपवास म्हटलं की, तेच तेच उपवासाचे पदार्थ आठवतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच उपवासाचे अनेक पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचा चिला कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2024 | 10:28 AM
Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा

Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा

Follow Us
Close
Follow Us:

यावर्षी 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरवात झाली आहे. हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण उत्सवांपैकी नवरात्री एक आहे. हा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो. यादरम्यान देवीची पूजा करून तिला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करत असतात. 9 दिवस हा उपवास केला जातो. आता इतके दिवस तेच तेच उपवासाचे पदार्थ खाणे तर काही शक्य नाही, कारण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो अशात तुम्ही काही हटके रेसिपी ट्राय करून त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

तुम्ही साबुदाण्याची खिचडी तर बऱ्याचदा खाल्ली असेल मात्र ही खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही यापासून चविष्ट असा चिला तयार करू शकता. साबुदाण्याचा हा चिला चवीला फार छान आणि वेगळा लागतो. उपवासाचे नवीन पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवा. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Navratri Special : झटपट बनवा जाळीदार आणि मऊ उपवासाची इडली-चटणी

साहित्य

  • अर्धा कप साबुदाणा
  • उकडलेले बटाटे
  • अर्धा कप भाजलेले शेंगदाणे
  • तूप
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • सैंधव मीठ
  • काळी मिरी पावडर
  • अर्धा चमचा जिरे
हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा चायनीज स्टाइल नूडल्स, लहान मुलांच्या आवडीची रेसिपी

कृती

  • साबुदाण्याची चिला तयार करण्यासाठी सर्वप्रथम 1/2 कप साबुदाणा 3-4 तास पाण्यात भिजवा, तुम्ही याला रात्रभर देखील भिजत ठेवू शकता
  • यानंतर प्रथम काही बटाटे उकळून घ्या
  • दुसरीकडे काही शेंगदाणे भाजून घ्या आणि मग यांचा मिक्सरमध्ये कूट करा
  • बटाटे उकळले की सोलून त्यांना मॅश करा
  • आता एका भांड्यात भिजलेले साबुदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेल्या शेंगदाण्यांनाचा कूट, काळी मिरी
  • पावडर, मीठ, जिरे घाला आणि एकत्र करा
  • आता त्यात मॅश केलेला बटाटा घाला आणि पुन्हा सर्व साहित्य नीट मिक्स करा
  • आता प्लॅस्टिक किंवा बटर पेपर घ्या. आपण त्याच्या अर्ध्या भागावर तूप लावा आणि त्यावर साबुदाण्याचे मिश्रण घाला
  • आता दुसऱ्या भागावर सुद्धा तूप लावा आणि झाकून ठेवल्यानंतर काहीतरी जड वस्तू ठेवून सपाट करा
  • तुमचा चिला तयार होईल, तुम्ही हा चिला प्लॅस्टिकच्या पिशवीवर हाताने थापूदेखील शकता
  • आता गॅसवर तवा ठेवा आणि यावर हलके तूप टाका
  • शेवटी तव्यावर तयार चिला टाका आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या
  • अशाप्रकारे तुमचा चविष्ट असा उपवासाचा चिला तयार होईल
  • हा चिला तुम्ही दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Navratri 2024 how to make sabudana chilla recipe for fasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 10:28 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.