Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Recipe: खिचडी सोडा आता उपवासाला बनवा साबुदाणा कटोरी चाट, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन अनेकदा कंटाळा येतो. नवरात्रीच्या उपवासात काही नवीन आणि हटके बनवून खायचे असेल तर साबुदाणा कटोरी चाट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सोशल मीडियावर याची एक सोपी रेसिपी शेअर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, उपवासाच्या साहित्यापासून ही चविष्ट रेसिपी तयार केली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2024 | 10:10 AM
Navratri Recipe: खिचडी सोडा आता उपवासाला बनवा साबुदाणा कटोरी चाट, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

Navratri Recipe: खिचडी सोडा आता उपवासाला बनवा साबुदाणा कटोरी चाट, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरवात झाली आहे. या सणानिमित्त अनेकजण देवीची मनोभावनेने पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. नवरात्रीचा उपवास काही सोपा नव्हे, हा उपवास अवघे नऊ दिवस केला जातो. अशात नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी लाइफ सेव्हर ठरणार आहे.

उपवास म्हटलं की, तेच तेच निवडक पदार्थ आठवू लागतात. मात्र तुम्ही या उपवासाच्या पदार्थांपासून अनेक वेगवगेळे पदार्थदेखील बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत उपवासाची एक चवदार रेसिपी शेअर करत आहोत. या रेसिपीचे नाव आहे साबुदाणा कटोरी चाट. चटपटीत आणि कुरकुरीत अशी ही चाट घरातील सर्वांनाच फार आवडेल. आजची ही हटके रेसिपी @chefguntas नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात ही उपवासाची चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा

साहित्य

  • 5 कप साबुदाणा (भिजवलेला)
  • एक उकडलेला बटाटा
  • 1/4 कप, चिरलेली कोथिंबीर
  • दोन हिरव्या मिरच्या
  • 1/2 कप शेंगदाण्याची कूट
  • 1/4 कप सिंघाड़ा पीठ (सिंघाड़ा फळाच्या बियांपासून बनवलेलं पीठ)
  • मीठ (सैंधव)
  • दोन चमचे जिरे

काटोरी स्टफिंगसाठी लागणारे साहित्य

  • दोन चमचे तेल
  • दोन उकडलेले आणि सोललेले बटाटे
  • एक चमचा जीरा पावडर
  • एक चमचा लाल मिरची पावडर
  • चवीनुसार मीठ

हेदेखील वाचा – Navratri Special : झटपट बनवा जाळीदार आणि मऊ उपवासाची इडली-चटणी

कृती

  • साबुदाणा कटोरी चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा रात्रभर किंवा काहीतास चांगला भिजवून घ्या
  • आता हा भिजवलेला साबुदाणा एका भांड्यात काढा आणि यात बटाटा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, सिंघाड़ा पीठ, जीरा, मीठ (सैंधव मीठ) टाका
  • त्यांनतर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा
  • नंतर एका छोट्या वाटीच्या मागच्या बाजूस तेल लावून घ्या आणि तयार मिश्रण त्याच्यावर चिटकवा
  • त्यानंतर ही वाटी गरम तेलात टाका व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेलात टाकताच ही कटोरी वाटीपासून वेगळो होईल
  • तेलात या साबुदाण्याच्या वाटीला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल घ्या, त्यात बटाटाट्याचे छोटे तुकडे, जीरा पावडर, लाल मिरची पावडर टाका आणि व्यवस्थित परतवून घ्या
  • तयार साबुदाणा कटोरीमध्ये फ्राय केलेला बटाटा, पुदिना चटणी, दही, चिंचेची चटणी, डाळिंब आणि शेव टाका
  • अशाप्रकारे तुमची उपवासाची साबुदाणा कटोरी चाट तयार होईल
  • कुटुंबासोबत या रेसिपीचा मनमुरादपणे आस्वाद घ्या

Web Title: Sabudana tokri chaat fasting recipe video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 10:10 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.