Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटसारखी मोमो चटणी आता घरीच बनवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

अनेकांना मोमो हा पदार्थ फार आवडतो मात्र या पदार्थाची खरी चव ही त्याच्या चटणीतून येत असते. अनेकजण घरी मोमो तर बनवतात मात्र त्यांना स्ट्रीट स्टाइल मोमो चटणी बनवता येत नाही. अशात आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरणार आहे. या रेसिपीमुळे मोमोज चटणीची चव अगदी बाजारात उपलब्ध असलेल्या चटणीसारखीच लागेल आणि तुम्ही ती मोमोज व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसोबत खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2024 | 11:28 AM
मार्केटसारखी मोमो चटणी आता घरीच बनवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

मार्केटसारखी मोमो चटणी आता घरीच बनवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

Follow Us
Close
Follow Us:

मोमोजचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मसालेदार चटणीसह गरम मोमोज हा संध्याकाळचा उत्तम नाश्ता आहे. बरेच लोक घरी मोमोज बनवत असले तरी त्यांची बाजारासारखी मसालेदार झणझणीत मोमो चटणी घरी बनवता येत नाही. तुम्हालाही घरी मोमो चटणी कशी बनवायची माहिती नसेल तर मग आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. बऱ्याचदा अनेक प्रयत्न केले तरी, घरी केलेल्या मोमो चटणीची चव तितकी चांगली होत नाही. मात्र आता काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला मोमोज चटणी बनवण्याची अशी रेसिपी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज बाजारासारखी मोमो चटणी घरीच बनवू शकाल.

तुम्ही ही चटणी फक्त मोमोज सोबतच नाही तर बटाटा पकोडे किंवा ब्रेड टोस्टसोबतही खाऊ शकता. याबरोबरच आम्ही तुम्हाला सांगतो की, ही चटणी घरी बनवताना जास्त सामग्री आणि वेळेचीही गरज भासत नाही. म्हणजेच ही चटणी तुम्ही अगदी कमी वेळेत तयार करू शकता. चला जाणून मग जाणून घेऊयात मोमो चटणीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Navratri Special : झटपट बनवा जाळीदार आणि मऊ उपवासाची इडली-चटणी

साहित्य

  • 2 मध्यम आकाराचे टोमॅटो
  • 3-4 सुक्या लाल मिरच्या
  • 3 कप पाणी
  • 1 टीस्पून चिरलेला लसूण
  • ¼ टीस्पून काळी मिरी
  • 1 सिचुआन मिरपूड
  • ½ टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ

हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा चायनीज स्टाइल नूडल्स, लहान मुलांच्या आवडीची रेसिपी

कृती

  • मोमो चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो धुवून कापून घ्या आणि वाळलेल्या लाल मिरच्यांच्या बिया काढून टाका.
  • एका पातेल्यात तीन कप पाणी उकळून घ्या
  • मग या उकळत्या पाण्यात टोमॅटो आणि मिरची टाका आणि मध्यम आचेवर 8-9 मिनिटे उकळवून घ्या, यामुळे
  • टोमॅटोची साल सहज वेगळी होईल
  • यानंतर उकडलेले टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून काढा आणि थंड होऊ द्या.
  • टोमॅटोचा वरचा भाग कापून घ्या आणि साल काढून टाका
  • आता टोमॅटो बारीक चिरून हाताने मॅश करा
  • आता मिक्सरच्या भांड्यात मॅश केलेले टोमॅटो, उकडलेल्या लाल मिरच्या, चिरलेला लसूण, काळी मिरी टाका
  • आता यात चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी टाका आणि मिक्सरमध्ये यांची गुळगुळीत पेस्ट तयार करा
  • तयार मोमो चटणी एका हवाबंद डब्यात साठवा आणि चटणीला तुम्हाला हवे तेव्हा खाण्यासाठी सर्व्ह करा
  • अनेक वेगवगेळ्या पदार्थांसोबत तुम्ही या चटणीचा आस्वाद घेऊ शकता

Web Title: Street style momo chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • momo

संबंधित बातम्या

चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी
1

चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी

ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी
2

ग्रेव्हीमध्ये बुडालेले टेस्टी आणि ज्यूसी Jhol Momo कधी खाल्ले आहेत का? नेपाळची फेमस रेसिपी

पावसाच्या थंड वातावरणात घरी बनवा गरमा गरम स्ट्रीट स्टाइल Chicken Momos
3

पावसाच्या थंड वातावरणात घरी बनवा गरमा गरम स्ट्रीट स्टाइल Chicken Momos

मोमो लव्हर्स आहात? तर यावेळी मैद्याच्या पिठापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरीच तयार करा Healthy Momos
4

मोमो लव्हर्स आहात? तर यावेळी मैद्याच्या पिठापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरीच तयार करा Healthy Momos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.