(फोटो सौजन्य: istock)
Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
लोहाची कमतरता
शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तर त्यामुळे शरीरातून जास्त रक्तस्त्राव होतो. लोह आणि पिरियड ब्लिडिंगचे थेट संबंध आहे. दर महिन्याला होणाऱ्या ब्लीडिंगमुळे शरीरात लोहचे प्रमाण कमी होते. शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्याने थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव आणि मनःस्थितीत बदल होऊ शकतो.
कोणत्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करायला हवा?
डाॅक्टरांच्या मते, मासिक पाळीदरम्यान आहारात पालक, डाळी आणि राजमाचा समावेश करायला हवा. मांसाहारप्रेमी आपल्या आहारात लाल मांसाचा समावेश करु शकतात. यासोबतच शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्तांचे सेवन केले जाऊ शकते. यात लिंबू, टोमॅटो आणि संत्र्यांचा समावेश होतो.
२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
मॅग्नेशियमची कमतरता
शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण स्नायू शिथिल करण्यात आणि मज्जासंस्थेचा समतोल राखण्यात मोठी मदत करत असतात. ज्या महिलांच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आढळते त्यांना मासिक पाळीदरम्यान भरपूर त्रास होतो याला डिसमेनोरिया असे म्हटले जाते. मॅग्नेशियमयुक्त आहाराचे सेवन केल्याने वेदनांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. यामुळे पेनकिलर घेण्याचीही गरज तुम्हाला भासणार नाही. शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया, बदाम, केळी आणि ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेट याचे सेवन करु शकता. याशिवाय तुम्ही मासिक पाळीदरम्यान अक्रोड आणि जवस सारख्या पदार्थांचाही समावेश करु शकता. याचे सेवन वेदना कमी करण्यास आणि मानसिक आराम मिळवून देण्यास मदत करते.






