Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल नष्ट! 'ही' फळे ठरतील शरीरासाठी गुणकारी

Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचा समावेश करावा. सफरचंद, संत्री, नाशपाती, ॲव्होकॅडो आणि जांभूळ इत्यादी फळांचे सेवन करावे. या फळांमधील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी फॅट्स असतात.
Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल नष्ट! 'ही' फळे ठरतील शरीरासाठी गुणकारी
Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल नष्ट! 'ही' फळे ठरतील शरीरासाठी गुणकारी
Published on: 
Updated on: 
  • खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?

  • कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे?

  • नियमित फळे खाण्याचे फायदे?

Cholesterol: धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. अतिप्रमाणात तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल साचून राहते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. LDL ची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर केवळ घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर या फळांचे आहारात सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)

सफरचंद:

सफरचंद खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत होते. दैनंदिन आहारात नियमित एक सफरचंद खावे. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद खावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. सफरचंदमध्ये असलेले पेक्टिन नावाचे विद्राव्य फायबर आतड्यांमधील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकतात.

संत्री:

आहारात संत्र्याचा समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यासोबतच रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. पचनसंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आंबटगोड चवीचे संत्र खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण अनेक लोक सकाळी उठल्यानंतर संत्र्याचा रस पितात पण त्याऐवजी नियमित एक संत्री खावे. विकतच्या संत्र्याच्या रसात अतिरिक्त साखर असलेल्या पॅकबंद ज्यूसचा आहारात समावेश करू नये.

ॲव्होकॅडो:

ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. आहारात लोणी किंवा इतर जास्त सॅच्युरेटेड फॅट खाण्याऐवजी ॲव्होकॅडोचा समावेश करावा. ॲव्होकॅडोमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे आहारात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा ॲव्होकॅडोचा समावेश करावा. यासोबतच जांभूळ, केळीइत्यादी फळांचे सेवन करावे. केळीमध्ये सोल्युबल फायबर्स शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यास मदत होते.