(फोटो सौजन्य: Pinterest)
ग्रीन टीच्या सेवनाने वजन कमी करण्यास किती मदत होईल?
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन (Catechins) नावाचे एंटीऑक्सीडंट असते. यात EGCG नावाचे तत्वदेखील सामील असते. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात कॅफेन देखील असते. हे दोन्ही शरीराच्या ऊर्जा वापरावर आणि चरबीच्या वापरावर परिणाम करू शकतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ऑफिस ऑफ डाइटरी सप्लीमेंट्सनुसार, ग्रीन टीमुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते. तथापि, याचा परिणाम फार काळ होत नाही, म्हणजेच वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टीवर निर्भर राहणे योग्य नाही. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्याची अपेक्षा करणे योग्य नाही.
ब्लॅक काॅफी वजन कमी करण्यास करेल मदत?
ब्लॅक काॅफीत कॅफिन नावाचे घटक असते जे झोप उडवण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करते. शरीरातील ऊर्जा खर्चावरही कॅफीनचा परिणाम होत असतो. हेच कारण आहे की, काही लोक वर्कआउट दरम्यान ब्लॅक काॅफी पिणे अधिक पसंत करतात. तथापि, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक काॅफी म्हणजे कोणता जाईदु उपाय नाही. काॅफीच्या सेवनाने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते पण यामुळे वजन कमी होण्यात फारशी मदत होत नाही. याउलट तुम्ही दररोज किती कॅलरीजचे सेवन करत आहात आणि किती कॅलरीज खर्च करत आहात यावर तुमचे वजन अवलंबून असते.
ब्लॅक काॅफी की ग्रीन टी, रिसर्च काय सांगते?
British Journal of Nutrition ने २०२४ साली प्रकाशित केलेल्या सिस्टमॅटिक रेव्हू आणि नेटवर्क मेटा-एनालिसिसमध्ये चहा आणि काॅफीमुळे वजनावर पडणाऱ्या फरकावर भाष्य केले होते. यामध्ये २२ यादृच्छिक चाचण्या आणि १,७१० प्रौढांचा समावेश होता. रिसर्चमध्ये ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास थोडी मदत झाल्याचे दिसले. तथापि, पुराव्याची गुणवत्ता मात्र कमी होती. दुसरीकडे काॅफीमुळे वजन कमी होण्यावर फारसा काही बदल दिसून आला नाही. याचाच अर्थ असा आहे की, काॅफी आणि ग्रीन टीमध्ये वजन कमी करण्यासाठी अधिक लाभदायक ग्रीन टी ठरतो. पण वजन कमी करण्यासाठी फक्त हेच पुरेसे नाही तर थोडा व्यायाम आणि पाैष्टिक आहाराचे सेवन देखील महत्त्वाची भूमिका बजावते.






