पेरूच्या पानांचे आरोग्यासाठी काय फायदे होतात जाणून घ्या
सध्या थंडीचा हंगाम असून या दिवसात पेरूचे भरपूर उत्पादन होते. पेरू खाण्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पेरूची पाने देखील खूप फायदेशीर असतात. तुम्हाला फक्त पेरूची पाने कशी वापरायची हे माहित असणे आवश्यक आहे. पेरूच्या पानांमध्ये शरीरासाठी अनेक आवश्यक पोषक घटक असतात आणि याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, हृदय निरोगी ठेवणे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे यासारखे अनेक फायदे मिळतात.
ठाण्यातील आयुर्वेदिक क्लिनिक ‘कामधेनू’मधील आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला हिवाळ्यात आलं खाण्याचं वेड असेल तर आता तुम्ही पेरूच्या पानांचा चहा वापरून पहा. यामुळे तुमची चव आणि आरोग्य दोन्ही चांगले राहू शकते, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
पचनक्रिया करते उत्तम
पचनक्रिया चांगली करण्यासाठीही उपयुक्त
पेरूची पाने त्यांच्या अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे पाचन समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. ही पाने हानिकारक जीवाणू (ई. कोलाय) प्रतिबंधित करतात आणि अतिसारापासून बरे होण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल वाढते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. पेरूच्या पानांचा चहा सूज आणि पेटके कमी करण्यास मदत करतो. पेरूची पाने पाण्यात उकळून चहा बनवा आणि दिवसातून 1-2 वेळा प्या. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी पेरूची ताजी पाने चघळून खा
डायबिटीस रुग्णांसाठी उत्तम
डायबिटीसवरील रामबाण उपाय
पेरूची पाने रक्तातील साखर कमी करू शकतात, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे आतड्यांमधील ग्लुकोजचे शोषण कमी करणारे एन्झाइम्स प्रतिबंधित करतात. पेरूच्या पानांचा चहा बनवा आणि जेवणानंतर प्या. ही एक आयुर्वेदिक पद्धत असून नैसर्गिकरित्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी कऱण्याचे आणि डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम ठरते
World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची, तज्ज्ञांचा खुलासा
वजनही होते कमी
वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त
पेरूची पाने गुंंतागुंतीच्या कार्ब्सचे साखरेत रूपांतरित होण्यास प्रतिबंध करतात आणि चरबीचे संचय कमी करतात. त्यांचे अँटिऑक्सिडंट लठ्ठपणाशी संबंधित जळजळ कमी करतात. जेवणापूर्वी पेरूच्या पानांचा चहा प्या. यामुळे तुमच्या शरीरावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्यास मदत मिळते आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नक्कीच पेरूच्या पानांचा चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. आयुर्वेदात याबाबत अधिक चांगले उपयोग सांगण्यात आले आहेत.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी
कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेरूची पाने
पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतात, तर चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. पेरूच्या पानांचा चहा नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा हृदयावर होत असतो. त्यामुळे पेरूच्या पानांचा चहा पिण्याने हृदय चांगले राहण्यासही मदत मिळते.
याशिवाय पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संक्रमणापासून संरक्षण करतात. ऋतूतील बदलांमध्ये पेरूच्या पानांचा चहा पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
Bad Cholesterol कमी करण्याचा रामबाण उपाय! फक्त ‘या’ सवयीचा करा अवलंब आणि पहा कमाल
पेरूच्या पानांचे अन्य फायदे
पेरूच्या पानांचे काय फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.