Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लासभर दूध आजारांना ठेवते दूर

  • By Nitish Gadge
Updated On: Sep 03, 2020 | 05:26 PM
ग्लासभर दूध आजारांना ठेवते दूर
Follow Us
Close
Follow Us:

कोल्डड्रिंग आणि चहा कॉफी यापेक्षा कायमच प्रत्येकवेळी दूध (Milk) पिण्यावर प्रत्येक घरात भर दिला जातो. आपल्याकडे दुधाला हेल्दी ड्रिंक (helthy drink) म्हणून ओळखले जाते. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने दूध घ्यावे असे म्हटले जाते ते यामुळेच. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ हे शरीरासाठी चांगले (health benifit’s) असतात. रोज दूध पिण्यामुळे हाडांची मजबूती टिकवण्याचं काम करतं. त्यामुळे बऱ्याचदा लहान मुलांना वयोवृद्धांना आणि विशेषत: महिलांना दूध घेण्याचा सल्ला कायम डॉक्टर देतात. दूध हे केवळ हेल्दी ड्रिंकच नाही तर मोठ्या आजारांवरील सर्वोत्तम उपाय म्हणूनही काम करते. त्यातही गायीचं दूध आणि तुपाला आयुर्वेदात महत्त्व आहे.

अस्थमा, डायबिटीस, कॅन्सर, कार्डियो वॅसकुलर, मेटाबोलिक सिंड्रोम, कोलन यासारख्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. असं ‘एडवांसेस इन न्यूट्रिशन’ जनरलच्या एका रिसर्चमधून समोर आले आहे.याशिवाय गर्भावस्थेत महिलांनी दूधाचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास पोटात असणाऱ्या बाळाचं वजन, सुदृढ होण्यास मदत होते. मात्र हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावं. रिसर्चनुसार बोन मिनरल डेन्सिटी, मांसपेशि, प्रेग्नेंसी आणि ब्रेस्टफीडिंगसाठी दूध उत्तम पर्याय आहे.

विटॅमिन्सचा खजाना

दूधात अधिक पोषक तत्व असतात. त्यापासून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सेलानियम, विटामिन ए आणि बी-12 मिळते. एक ग्लास दूध घेतल्यामुळे पौष्टिक तत्वही मिळतात आणि भूकही शमते. उकळून थंड केलेले दूध रोज रात्री घेणे हा ॲसिडिवर सर्वोत्तम पर्याय आहे. दुधामुळे बुद्धी तल्लख रहाते. पौष्टिक तत्वांमुळे शरीरात ताकद येते. दूधात वेलची किंवा दूधात थोडी हळद घालून घेतल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. रोज दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तजेलदार दिसते.

काही तोटेही…

हे सगळे दुधाचे फायदे असले तरी प्रत्येकालाच दूध घेतल्याने फायदा होतोच असे नाही. काही वेळा दूधाच्या चुकीच्या सेवनामुळे  किंवा दूधानेही त्रास होऊ शकतो.  दूध घेण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का? दूधाचे अतिसेवन केल्याने भूक मरते. पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा कच्चे दूध प्यायल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो. दूधात जरी चांगले बॅक्टेरिया असले तरीही फूड इन्फेक्शन झालेल्यांनी दुधाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. दूध पचनासाठी जड असल्याने पोट फुगणे, गॅस यासारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. रोज सकाळी आणि रात्री दूध प्या आणि तंदूरूस्त रहा असे अनेकवेळा म्हटले जाते. मात्र दूध हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. बऱ्याचवेळी आपल्या शरीराच पचनक्रियेसाठी दूध योग्य आहे का हे ही पाहाणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Health benefits of drinking milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2020 | 05:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.