Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे सामान्य लक्षणे समजून दुर्लक्ष केले जाते. योग्य उपचार न मिळाल्यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे,  दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे
Published on: 
Updated on: 
  • हार्ट अटॅक येण्याची कारणे?

  • हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?

  • महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, झोपेचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात बदल होतात. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने समस्या हळूहळू वाढत जातात आणि आरोग्याला धोका निर्माण करतात. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, वाढत उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात बदल होतात.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. थकवा, अशक्तपणा, धाप लागणे किंवा थोडस चालल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. हार्ट अटॅक येण्याआधी छातीमध्ये वेदना होतात, असेच कायम सगळ्यांना वाटते. पण असे नसून हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात विविध लक्षणे दिसून येतात. श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे किंवा थंड घाम येणे यांसारख्या लक्षणांकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात 'हे' बदल:

अचानक प्रचंड थकल्यासारखे वाटणे:

पुरेशी झोप घेतल्यानंतर सुद्धा खूप जास्त थकल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. शरीरात सतत जाणवणाऱ्या थकव्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. धाप लागणे किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होणे हे संकेत हार्ट अटॅक येण्याचे आहेत. याशिवाय काहीवेळा छातीमध्ये वेदना होत नसताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो.

मळमळ आणि उलट्या होणे:

अचानक मळमळणे, उलट्या होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. अनेकदा मळमळ किंवा कोणत्याही कारणाशिवाय उलटी सारखं होत असेल तर अपचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण होतो. कोणतेही कष्टाचे काम न करता अचानक थंड घाम येत असेल तर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल.

अचानक चक्कर आल्यासारखे वाटणे:

अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची कोणतीही सामान्य किंवा तीव्र लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.