'या' आजाराच्या रुग्णांनी खाऊ नये जास्त बिया असलेली फळं, काय सांगतात तज्ज्ञ
फळं किंवा फलभाज्या खाणं हे आरोग्यदायी आहे. दिवसातून एक तरी फळ खावं त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात. मात्र हीच फळं काही जणांसाठी विष असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चला तर मग जाणून घेऊयात जास्त बिया असलेली फळं कोणी खाऊ नयेत.
प्रत्येक फळात बिया या असताता मात्र काही फळांत असलेल्या अतिरीक्त बिया खाण्यात ही येतात आणि यांच प्रमाण शरीरात जास्त झालं तर त्रास होण्याची शक्यता असते. जसं की पेरु, टोमॅटो, वांगी,, काकडी आणि भेंडी या फळांत आणि फळभाज्यांमध्ये अतिरिक्त बिया असतात. त्यामुळे यी आजारी असलेल्या रुग्णांच्या शरीरात या बियांचं प्रमाण जास्त वाढलं तर आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. असं तज्ज्ञ वारंवार सांगतात.
खरंतर टोमॅटो आणि पेरु यांना बहुगुणी मानलं जातं. टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते तर पेरुमध्ये दात आणि हाडांना चांगली बळकटी येते म्हणून ही फळं आरोग्य़ासाठी वरदानआहेत. मात्र असं असलं तरी काही जणांसाठी या फळांच अतिरिक्त सेवन करणं आरोग्यासाठी गंभीर कारण ठरु शकतं.
हेही वाचा-नखांवर डाग येणे सामान्य नाही; ‘या’ व्हिटॅमिनची असू शकते कमी
ज्यांना किडनी संबंधित आजार आहेत अशा माणसांनी जास्त बिया असलेली फळं किंवा फळभाज्या खाऊ नयेत असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. टोमॅटो, पेरु , भेेंडी आणि वांगी यातल्या बिया काढल्या जात नाही. या फळं आणि फळभाज्य़ांचं सेवन बियांसकट केलं जातं. त्यामुळे किडनीशीसंबंधित आजार बळावतात.म्हणूनच जर स्टोनचा त्रास असेल किंवा लघवीची समस्या वारंवार होत असेल तर या फळांचं समावेश आहारात कमी असावा असा सल्ला दिला जातो. किडनी संबंधित शस्त्रक्रिया झाली असेल तर पेरु, टोमॅटो, वांगी , काकडी आणि भेंडी यांबरोबरच चवळी आणि पालक खाऊ नये असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं.
हेही वाचा-गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन
टोमॅटो, वांगी, काकडी, पेरु,पालक आणि भेंडी यांच्यामध्ये कॅल्शिअमची मात्रा अधिक असते. अतिरिक्त कॅल्शिअम असलेले पदार्थांमुळे किडनीवर याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे स्टोनचा त्रास जास्त वाढतो. तसंच टोमॅटोमध्ये हायपरकॅलेमिया घटक अधिक आढळतो त्यामुळे किडनीवर गंभीर परिणाम होतो. पालक आणि चवळी यांच्यात कॅल्शिअमची मात्रा अधिक असते. त्यामुळे स्टोनच्या रुग्णांनी या पदार्थांचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तुम्ही
जर बोरींगचं पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर याचा हळूहळू गंभीर परिणाम किडनीवर होऊ शकतो. बोरवेलमधून आलेलं पाणी हे कातळातून येतं. हे पाणी नैसर्गिक असलं तरी पिण्यासाठी जड असतं. या पाण्यात मातीतले क्षार मिसळलेले असतात, त्यामुळे अतिरिक्त क्षार आणि कॅल्शिअममुळे किडनीला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)