खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करावे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला हे आजार वाढी लागतात. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या दिवसांमध्ये रोगराई वाढल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सर्दी खोकला होतो. सर्दी, खोकला झाल्यानंतर हळूहळू ताप येणे, डोके दुखणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे आहारात बदल करून निरोगी जीवनशैली जगणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करावे
हळदीचा वापर स्वयंपाक घरातील प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे सतत येणाऱ्या खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच पावसाळ्यात घश्याला येणारी सूज कमी करण्यासाठी हळद प्रभावी आहे. त्यामुळे वाढलेला खोकला कमी करण्यासाठी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.
हे देखील वाचा: दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेल्या ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश, हाडे होतील मजबूत
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करावे
तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी मदत करतात.शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे नियमित तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करावे
काळीमिरीपासून बनवलेला काढा अनेक आजारांवर गुणकारी आहे. काळीमिरीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, हे गुणधर्म शरीरातील हवामानामुळे होणारे संक्रमण कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असलेली काळीमिरी अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. त्यामुळे काळीमिरी पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करून प्यावे.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करावे
लसणीचा वापर जेवणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. लसणीमध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे वाढलेला खोकला कमी करण्यासाठी मदत करतात. लसणीचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कच्च्या लसूणसोबत एक लवंग खावी.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करावे
मधाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोकला झाल्यानंतर मधाचे सेवन करावे. यामुळे खोकला कमी होऊन घशाची सूज कमी होते. एक चमचा मधात चिमूटभर हळद टाकून खावे. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.