नियमित दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळते. दुधाचा कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने नेहमी सकाळी उठल्यानंतर दूध प्यावे. दात आणि हाडांचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी दुधाचे सेवन करावे. पण काहींना दूध पिणे आवडत नाही. दूध न पिणाऱ्या लोकांच्या शरीरात दुधाची कमतरता जाणवते. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
रोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करा
भेंडी आणि ब्रोकोलीमध्ये एक गॅस दुधाएवढं कॅल्शियम असत, त्यामुळे आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करावे.
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काळ्या तीळांचे सेवन करावे. १० ग्रॅम काळ्या तीळांमध्ये ४० मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर २ ते ३ चमचे काळे तीळ खावेत.
दुधापेक्षा जास्त कॅल्शियम डाळींमध्ये असते. १०० ग्राम राजमा, काबुली चणे, काळी डाळ, कुळीथ यांमध्ये २०० ग्राम पेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करावा.
रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. २४० ग्राम पालकमध्ये ३२२ मिलीग्राम कॅल्शियम असते.
Untitled design - 2024-07-29T130130.696