Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकल पद्धतीने केस कलर करणे सोडा आणि अशाप्रकारे घरीच तयार करा नैसरगिक हेअर कलर

रासायनिक प्रोडक्टसचा वापर करून केसांना कलर असाल तर वेळीच थांबा. केसांच्या आरोग्यास रासायनिक कलर घातक ठरतात. मात्र आता तुम्ही नैसर्गिक पद्धतीने घरीच केस काळेकुट्ट कलर करू शकता. जाणून घ्या योग्य पद्धत. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2024 | 06:00 AM
घरीच तयार करा नैसरगिक हेअर कलर

घरीच तयार करा नैसरगिक हेअर कलर

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या वयोमानानुसार अनेकांचे केस पांढरे होऊ लागतात. पांढरे केस कोणालाही आवडत नाहीत याने आपण वयोवृद्ध वाटू लागतो ज्यामुळे अनेकजण आपले पांढरे केस काळे करण्यासाठी रासायनिक कलरचा वापर करतात. आजच्या धावपळीच्या युगात तर तरुणांनाही पांढऱ्या केसांची समस्या उद्भवू लागली आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक हेअर कलर्स उपलब्ध आहेत मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, केसांसाठी हे रासायनिक कलर फार घातक ठरत असतात.

रासायनिक कलरमुळे केसांच्या समस्या वाढू लागतात आणि केसं झपाट्याने खराब होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक कलर कसा तयार करावा याचा एक सोपा उपाय सांगत आहोत. या उपायाने तुमचे केस कोणत्याही रासायनिक पदार्थाशिवाय नैसर्गिक रीतीने काळेकुट्ट होतील. तसेच यामुळे तुमच्या केसांच्या निगा राखली जाईल.

हेदेखील वाचा – मीरा राजपूतने सांगितले सुंदर-मजबूत केसांचे रहस्य! घरातच ‘हा’ उपाय करून पाहा

आज आम्ही तुम्हाला दह्यापासून केसांसाठीचा नैसर्गिक कलर कसा तयार करायचा याचा एक सोपा उपाय सांगत आहोत. दही आरोग्यासाठी तसेच केसांसाठी फार फायदेशीर ठरते. केसांची चमक, मजबूती, आणि पोषण वाढवण्यासाठी दहीचा वापर केला जातो. दहीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी५, आणि व्हिटॅमिन डी आढळते, जे केसांच्या मुलांना पोषण देण्याचे काम करते. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केसांचे तुटणे कमी होते.

अशाप्रकारे तयार करा हेअर मास्क

साहित्य

  • एक कप दही
  • दोन चमचे मेथीच्या बिया
  • एक मध्यम कांदा
  • दोन चमचे नारळ तेल
  • एक मध्यम बीटरूट

कृती

  • हेअर मास्क तयार करण्यासाठी प्रथम मेथीच्या बिया रात्रभर भिजत ठेवा
  • दुसऱ्या दिवशी या बियांची एक पेस्ट तयार करून घ्या
  • दुसरीकडे कांद्याचा रस तयार करा
  • मग बीटरूटची पेस्ट तयार करा
  • यांनतर एका भांड्यात दही घ्या
  • यात मेथीच्या बियांचा पेस्ट, कांद्याचा रस, बीटरूट पेस्ट, आणि नारळ तेल टाका आणि मिक्स करा
  • सर्व साहित्य चांगले एकत्र करा
  • तुमचा हेअर मास्क तयार आहे
  • हा तयार हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावा
  • यांनतर हा मास्क 30-35 मिनिटे केसांवर लावून ठेवा आणि मग कोमट पाण्याने केस धुवून टाका

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies now you can make hair mask at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • haircare

संबंधित बातम्या

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही
1

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही

शून्य रुपयांत केसगळतीपासून मिळेल आराम, स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ निर्जीव केसांना करेल जिवंत; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
2

शून्य रुपयांत केसगळतीपासून मिळेल आराम, स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ निर्जीव केसांना करेल जिवंत; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

कमकुवत केसांना मिळेल पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, केस गळतीची समस्या होईल दूर
3

कमकुवत केसांना मिळेल पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, केस गळतीची समस्या होईल दूर

Hair Care Tips : केसांसाठी नैसर्गिक टॉनिक; एक चमचा बडिशेपचा ‘असा’ करा वापर
4

Hair Care Tips : केसांसाठी नैसर्गिक टॉनिक; एक चमचा बडिशेपचा ‘असा’ करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.