सुंदर त्वचेसाठी घरी तयार करा टोनर
सण समारंभाच्या दिवसांमध्ये सर्वच महिला नटून थटून छान तयार व्हायला खूप आवडत. महिला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. हे उपाय केल्यानंतर त्वचा सुंदर आणि चमकदार होते मात्र त्वचेची गुणवत्ता हळूहळू खराब होऊ लागते. दिवाळी किंवा सणांच्या दोन किंवा तीन दिवस आधी महिला पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप किंवा मग फेशिअल करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळ त्वचा खूप सुंदर आणि टवटवीत दिसते. मात्र काही दिवसांनंतर चेहरा काळवंडून जातो. त्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहतो आणि त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला दिवाळी सणाच्या पूर्वी सुंदर आणि चमकदार त्वचेचा मिळवण्यासाठी घरी कशा प्रकारे टोनर तयार करावे, याची सोपी सांगणार आहोत. या टोनरचा वापर केल्यामुळे त्वचेवर काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:चेहऱ्यावर आलेले वांग, काळे डाग घालवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, डाग होतील कमी
सुंदर त्वचेसाठी घरी तयार करा टोनर
स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी करता येतो. घरी बनवलेले मेकअप प्रॉडक्ट नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवले जातात. घरी बनवलेल्या टोनरचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. टोनरचा वापर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी केला जातो. कोणत्याही त्वचा प्रकारातील व्यक्ती टोनरचा वापर करू शकता.
त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर केला जात आहे. तसेच त्वचेवर होणारी जळजळ आणि आग कमी करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता. गुलाब पाणी वापरल्यामुळे त्वचा फ्रेश आणि ताजी टवटवीत दिसते. कोरफड आणि गुलाब पाण्याचे टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड जेलमध्येगुलाब पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण नियमित सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना त्वचेवरलावा . ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल.
सुंदर त्वचेसाठी घरी तयार करा टोनर
काकडीमध्ये 90 टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे रोजच्या आहारात काकडीचे सेवन करावे. पोटातील आग शांत करण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काकडीचे सेवन केले जाते. काकडीचे टोनर बनवण्यासाठी काकडीची साल काढून काकडी व्यवस्थित किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागेल. काकडी खाल्यामुळे त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.
हे देखील वाचा:दिवाळीपूर्वी चेहऱ्यावरील पिगमेंटेशन होईल कमी! आठवड्यातून दोनदा करा ‘हे’ घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन केले जाते. नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवते. त्यामुळे तुम्ही नियमित नारळ पाण्याचे सेवन करू शकता. पिंपल्स मुक्त त्वचेसाठी तुम्ही नारळाचे पाणी त्वचेला टोनर म्हणून लावू शकता. हे पाणी त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी मदत करेल.