कापूर आणि लवंग या अशा वस्तू आहेत ज्यांचा घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोग होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये याचे काही उपाय सांगितले गेले आहे. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. लवंग आणि कापूरचे काही सोपे उपाय जाणून घेऊया. (फोटो सौजन्य- freepik)
ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर केला आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय केले, तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीत फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला लवंग आणि कापूरचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
संध्याकाळच्या वेळी करा हे उपाय
संध्याकाळी चांदीच्या भांड्यात कापूर टाकून लवंग जाळल्याने व्यक्तीला जीवनात आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. हा उपाय रोज केल्याने माणसाला पैशाची कमतरता भासत नाही. घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर आणि लवंगा जाळून त्याचा धूर घरभर दाखवावा.
मंगळवारचे उपाय
तुमच्या जीवनात अनेक समस्या असतील, तर मंगळवारचा हा उपाय प्रभावी ठरू शकतो. यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पाच लवंगा आणि एक कापूर एकत्र जाळून सुख-समृद्धीसाठी हनुमानजींची प्रार्थना करा. आता तिळक म्हणून तिची राख कपाळावर लावावी. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.
प्रगतीची संधी मिळेल
जीवनात यश मिळवायचे असेल, तर सुपारीच्या पानात लवंग, सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा. यानंतर, यशासाठी प्रार्थना करा. असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यश मिळवू शकता.