Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी भाषेला ‘मराठी’ हे नाव कस पडलं? शब्दाच्या नावामागची रंजक कथा जाणून घ्या

आपल्या मराठी भाषेविषयीचे प्रेम जन्मपासूनच आपल्यात रुजू लागते. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा असे आपण अनेकदा गर्वाने बोलतो मात्र मराठी या आपल्या मायबोलीचा शोध नक्की कुठून लागला? यामागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मग आजच जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2024 | 12:14 PM
मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कस पडलं? शब्दाच्या नावामागची रंजक कथा जाणून घ्या

मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कस पडलं? शब्दाच्या नावामागची रंजक कथा जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळींचा उच्चार होताच मनात एक अभिमानाची भावना निर्माण होते. मराठी आपली मायबोली, जन्मापासूनच आपण या भाषेशी जोडले जातो आणि ही भाषाही सहज आपल्याला आपलीशी करते. राज्यच्या प्रत्येक जागी मराठीचा गोडवा बदलत जातो मात्र भाषा तिचं राहते. आज ज्या गर्वाने आपण आपल्याला मराठी बोलवून घेतो, तो मराठी शब्द नक्की कुठून आला?आपल्या मराठी भाषेचं वय नेमकं किती असेल? असे प्रश्न कधी तुमच्या मनात आलेत का? मुळात महाराष्ट्राची राज्यभाषा असणाऱ्या या मराठी भाषेला मराठी हे नाव कसे प्राप्त झाले आणि त्यामागचा इतिहास याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

मराठी भाषेचा इतिहास

आठव्या शतकाच्या शेवटी लिहिल्या गेलेल्या ‘कुवलयमाला कथा’ नावाच्या ग्रंथात जवळपास 18 देशी भाषांचा उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येते. त्या भाषांमध्ये ‘मरहट्ट’ नावाचीही एक भाषा आढळून येते. मरहट्ट जनसमुदाय आणि त्यांच्या भाषेच्या वर्णनासाठी ‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कळहसीले य दिण्णले गहिल्ले उल्लाविरे तत्थ मरहट्टे’ असे लिहिण्यात आले आहे.

मराठी भाषेच्या उदयाची गोष्ट 859 मध्ये घेऊन जाते. जिथे ‘धर्मोपदेशमाला’ ग्रांथमध्येही ‘मरहट्ट’ भाषेचा उल्लेख असल्याचे आढळून येते. हे सर्व उल्लेख बघता मराठी भाषेला प्राचीन काळात ‘मरहट्ट’ म्हटले जात असावे, असे प्रचित होते. मराठी भाषेच्या नावाचा उल्लेख यादवकालीन साहित्यामध्येही करण्यात आला जिथं या भाषेसाठी ‘मऱ्हाटी’ असा शब्द वापरला गेल्याचे दिसून येते. मऱ्हाटीसोबतच त्या काळात मराठी भाषेसाठी असणारं दुसरं नाव म्हणजे ‘देशी’. महानुभव पंथांचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा उल्लेख अशाच प्रकारे असल्याचे दिसून येते.

हेदेखील वाचा – 3 वर्षे रात्रंदिवस काम करत राहिले 9 हजार मजूर तरीही हिटलरच्या आलिशान हॉटेलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही…

काळ पुढे गेला आणि मऱ्हाटीचे बहुविध उच्चार केले जाऊ लागले. पुढे ‘ऱ्ह’ शेवटच्या ‘टी’ला जोडला जाऊ लागला आणि त्यातूनच उदयास आलेला शब्द ठरला ‘मराठी’. मराठी भाषेच्या आणि त्याहूनही या भाषेला मराठी हे नाव मिळण्यामागेही अनेक संदर्भ आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मराठी हा शब्द महाराष्ट्र या शब्दाच्या अपभ्रंशातुनही आल्याचे काहींचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशातील एरण येथे सुमारे इ.स. चौथ्या शतकातील शिलालेख सापडला होता. त्यात सर्वप्रथम ‘महाराष्ट्र’ या नावाचा उल्लेख आढळला होता. हा शिलालेख शक राजा श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग याने युद्धात मरण पावलेल्या नाग लोकांच्या स्मरणार्थ उभारला होता. विशेष म्हणजे या लेखात सत्यनाग याने तो ‘माहाराष्ट्र’ म्हणजे महाराष्ट्रचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. यावरूनच प्राचीन महाराषट्रात नाग लोकांची वस्ती होती असे मानले जाते.

Web Title: How did the marathi language get the name marathi know the interesting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 12:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.