सोनाक्षीचे मुंबईतील घर पाहा होम डेकोर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. सोनाक्षीने तिचा प्रियकर आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न केले. लग्नाच्या दिवसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोनाक्षीचे स्वतःचे मुंबईत घर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सोनाक्षीने आपल्याच घरात लग्न केले आहे. तिचे हे घर किती मोठे आहे? आणि या घराचे इंटिरिअर कसे आहे ते आपण या लेखातून पाहूया.
ArchdigestIndia मासिकाने आपल्या Instagram खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनाक्षीच्या संपूर्ण घराचे फोटो आणि खासियत दाखविण्यात आली आहे. तुम्हीही सोनाक्षीच्या या घराच्या डेकोरवरून प्रेरणा घेत स्वतःच्या घराचा लुक बदलू शकता. पाहा कसे आहे सोनाक्षीचे घर (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
उत्तम रंगसंगती
होम डेकोर (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सोनाक्षीचे 4000 चौरस फूटांचे घर हे तिच्या आवडीनुसार डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त हवा खेळती राहील आणि उत्तम रंगसंगतीचा विचार करण्यात आला आहे. गुलाबी, निळा, पांढरा अशा सर्व रंगांचा वापर करून याचे डेकोर करण्यात आले आहे.
योगा एरिया आणि ड्रेसिंग रूम
सोनाक्षी सिन्हा होम डेकोर (फोटो सौजन्य – Instagram)
या घरामध्ये योगाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि फिटनेससाठी एक जागा डेकोर करण्यात आली आहे. तर व्हाईट रंगाची ड्रेसिंग रूमही लक्ष वेधून घेत आहे. तुम्हीही अशा पद्धतीने ड्रेसिंग रूमसाठी डिझाईनचा विचार करू शकता. रेड आर्किटेक्स्टने हे घर डिझाईन केले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बदल करून घर सजवू शकता.
मर्फी बेड्स
बेड्सचे डेकोर (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सोनाक्षीचे हे घर ४ बेडरूमचे असून यामध्ये वेगवेगळे डिजाईन करण्यात आले आहे. बेडरूम ही सर्वांची हक्काची जागा असते आणि या ठिकाणी तुम्हाला मर्फी बेड्स दिसून येत आहे. निळ्या रंगाचा वॉर्डरोब आणि फिकट रंगाची बेडशीट्स पाहून खूपच क्लासी दिसून येत आहे. एखाद्याला आपली एकट्यासाठीही अशा पद्धतीच्या डेकोरेशनची रूम सजवता येऊ शकते.
वूड फर्निचर
क्लासी लाकडी फर्निचर (फोटो सौजन्य – Instagram)
तर दुसऱ्या बेडरूमध्येदेखील हवा खेळती राहील असेच डेकोर करण्यात आले आहे. याशिवाय पडद्यांची रंगसंगतीदेखील लक्ष वेधून घेत आहे. तर वूड फर्निचर असून अगदी माफक वस्तूंचा बेडरूमध्ये समावेश करण्यात आला आहे. पसारा वाटू नये याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली आहे.
आर्ट स्टुडियो आणि बसण्याची जागा
आर्ट स्टुडिओ आणि निवांत बसण्याची जागा कशी असावी (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सोनाक्षीच्या घरात तिचे प्रोफेशन लक्षात घेऊन एक आर्ट स्टुडिओ करण्यात आला आहे. जिथे तिला फॅशनसाठी वेळ देता येईल आणि अगदी माफक फर्निचर इथे ठेवण्यात आले असून अत्यंत क्लासी आणि एलिगंट लुक देण्यात आलाय. तर हॉलच्या बाहेर असणाऱ्या बाल्कनीमध्येही क्लासी सोफा सेट लावून निवांत बसण्याची जागा करण्यात आली आहे.
समुद्राचा नजारा
हॉलमधील एलिगंट इंटिरिअर (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
समोर मोकळे आकाश आणि समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळेल अशा पद्धतीने हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यात आले आहेत आणि याशिवाय कालिन, संपूर्णतः वूड फर्निचर, मोठा टी.व्ही ठेवण्यात आला असून याठिकाणी एखादी पार्टीही करता येईल इतकी जागा ठेवण्यात आली आहे. या सर्व डेकोर वैशिष्ट्यांमुळे सोनाक्षीचे घर हे अधिक सुंदर आणि क्लासी दिसून येत आहे.