
फोटो सौजन्य - Social Media
चेहऱ्याची सुंदरता केवळ ग्लोइंग स्किन, परफेक्ट नोज किंवा मोठ्या डोळ्यांपुरती मर्यादित नसते. व्यक्तिमत्त्वाला उठावदार रूप देण्यात जॉलाइन म्हणजेच जबड्याची बनावट खूप मोठी भूमिका बजावते. शार्प, डिफाइंड आणि टोंड जबडा चेहऱ्याला आकर्षक फ्रेम देतो, वय तरुण दिसते आणि फोटोमध्येही चेहऱ्यावर नैसर्गिक कॉन्फिडन्स जाणवतो. वाढते वजन, वय, ढिली त्वचा किंवा लहानसहान सवयींमुळे जॉलाइनची नैसर्गिक शेप बिघडू शकते. पण चांगली गोष्ट म्हणजे योग्य फेस एक्सरसाइजच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमची जॉलाइन पुन्हा आकर्षक आणि सुडौल बनवू शकता.
चला तर मग जाणून घेऊया त्या सोप्या पण परिणामकारक फेस एक्सरसाइज ज्या नियमित केल्यास चेहऱ्याचा लुक बदलू शकतो.
चिन लिफ्ट
छताकडे मान उंच करून बघा आणि ओठांना ‘किस’च्या पोझमध्ये वरच्या दिशेने ताणा. ही स्थिती 5 सेकंद धरून ठेवा आणि रिलॅक्स व्हा. हे 10 वेळा करा. मान–चिन परिसरातील चरबी कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज अत्यंत प्रभावी आहे.
चेखबोन लिफ्ट
गालांवर दोन्ही हातांनी हलक्या दाबाने वरच्या बाजूला लिफ्ट देत स्माईल करावी. काही सेकंद होल्ड करा. यामुळे गालांची मसल्स टोन होतात आणि जॉलाइनला नेचरल शार्पनेस मिळतो.
फिश फेस
गाल आत ओढून मच्छीसारखा चेहरा बनवा आणि 10 सेकंद होल्ड करा. दिवसातून 10 वेळा ही क्रिया करा. गाल आणि जबड्याच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे.
जॉ क्लींच
जबडा घट्ट दाबून 5 सेकंद होल्ड करा. स्नायूंवर ताण पडल्याने जॉ मसल्स अधिक मजबूत आणि डिफाइंड होतात.
नेक रोलिंग
मान गोलाकार फिरवणे हा साधा पण प्रभावी व्यायाम आहे. घड्याळाच्या दिशेने आणि उलट दिशेने मान हलवा. यामुळे जबडा, मान आणि खांद्यांभोवतीच्या मसल्स एक्टीव्ह होतात.
जीभ बाहेर काढणे
जीभ शक्य तितकी बाहेर काढा आणि 10 सेकंद होल्ड करा. डबल चिन कमी करण्यासाठी ही सोपी क्रिया चमत्कारिक परिणाम देऊ शकते.
अल्फाबेट O आणि E बोलणे
‘O’ आणि ‘E’ उच्चारताना चेहऱ्याच्या मसल्सवर नैसर्गिक स्ट्रेच येतो. हा छोटा व्यायाम जॉलाइनला अतिरिक्त टोनिंग देतो.
दररोज फक्त 10–15 मिनिटे या फेस एक्सरसाइज केल्यास जॉलाइन हळूहळू शार्प दिसू लागते. यामुळे चेहऱ्याची सौंदर्यवृद्धी तर होतेच, पण व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासही जाणवेल. कोणतेही सप्लिमेंट, क्रीम किंवा महागडे ट्रीटमेंट न वापरता, फक्त काही मिनिटांच्या या रुटीनमुळे तुम्हाला हवा तसा शार्प आणि डिफाइंड लुक मिळू शकतो.