नोकरी करणारे जोडपे (फोटो सौजन्य - iStock)
नवरा-बायकोपैकी एकानेच काम केले, तर एक व्यक्ती घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी खंबीरपणे उभं राहतं आणि दुसरं बाहेरच्या जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. पण जर जोडप्यापैकी दोघेही काम करत असतील तर व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल राखणे खूप कठीण होते.
अशा परिस्थितीत विवाहित जोडप्यांमधील अंतर वाढण्याचा धोका वाढतो. आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे जोडप्यांमधील प्रेम अबाधित राहते आणि नात्यातील दुरावाही दूर होईल. सध्या ही परिस्थिती खूपच जास्त वाढत असलेली दिसून येत आहे आणि त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. यातून कसे बाहेर पडावे जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
वैयक्तिक – व्यावसायिक वेगळे ठेवा
नोकरी आणि घर वेगवेगळे विषय हवेत (फोटो सौजन्य – iStock)
ऑफिसमध्ये खूप गप्पागोष्टी किंवा काम असले तरी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन पूर्णपणे वेगळे ठेवावे. ऑफिसबाबत तुम्ही एकमेकांशी गोष्टी शेअर करा. मात्र तुम्ही सतत ऑफिसच्या विचारात राहू नका. पती-पत्नीने एकमेकांशी प्रेमाने बोलणे चांगले. यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. एकमेकांबाबत, घराबाबत, मित्रमैत्रिणी, कुटुंब याबाबत बोला, कामाबाबत बोलणे टाळा.
केवळ पत्नीवर घराची जबाबदारी नको
सर्वप्रथम, पतीने विचार केला पाहिजे की त्याने घराची जबाबदारी पूर्णपणे पत्नीवर टाकू नये कारण ऑफिस नंतर ती घरातील कामे त्याच ताकदीने करू शकणार नाही. तीदेखील तुमच्याप्रमाणेच दमून घरी येते. त्यामुळे घरातील कामात तिची मदत करा. उदाहरणार्थ, स्वयंपाक आणि साफसफाईची कामे आपापसात विभागून घ्या, जेणेकरून एका व्यक्तीवर ओझे वाढू नये.
घरखर्च शेअर करा
खर्चाचा भार वाटून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
घर चालवण्यासाठी पैशांची गरज असते, जेव्हा पती-पत्नी दोघेही काम करत असतात तेव्हा त्यांनी घराचे बजेट शेअर केले पाहिजे. यामुळे कोणावरही पैशाचा भार पडणार नाही. आणि समोरची व्यक्ती आपला आदर वा आपली कदर करत नाहीये असं वाटणार नाही. आपण भविष्यासाठी काही पैसेदेखील वाचवले पाहिजेत.
एकमेकांना आठवड्यातून १ दिवस द्यायलाच हवा
जेव्हा पती-पत्नी दोघेही ऑफिसला जातात तेव्हा दोघांची आठवड्याची सुट्टी एकाच दिवशी असेल याची खात्री करून घ्या, तरच तुम्हाला एकमेकांसह वेळ घालवता येईल. वीकेंडला घरातील महत्त्वाची कामे एकत्र आटोपल्यानंतर पती-पत्नीने फुरसतीचा वेळ एकत्र घालवला पाहिजे. शक्य असल्यास एकत्र मुव्ही, डिनर किंवा टूरसाठी बाहेर जा.
बाळाची काळजी एकत्र घ्या
बाळासाठी योग्य विचार (फोटो सौजन्य – iStock)
जेव्हा तुम्ही बाळाला जन्म द्यायचा विचार करता तेव्हा निश्चितपणे ठरवा की भविष्यात मुलाची काळजी कशी घेतली जाईल. साधारणत: मूल झाल्यानंतर महिलांना नोकरी सोडावी लागते, त्यामुळे संघर्ष वाढू शकतो. अशा परिस्थितीत, कोणताही त्रास वा दुरावा येणार नाही याचा नीट विचार करा.