
फोटो सौजन्य - Social Media
पावसाचे ऋतू सुरु आहे. या पावसात गरमागरम भजी त्याबरोबर चहाची सोबत प्रत्येकाला हवीहवीशी असते. पावसाळ्यात प्रत्येकजण भजीचा चाहता होता. या पावसामध्ये भजीची चव काही औरच लागते. परंतु, पावसाळ्यात पाऊस तर रोजच असतो. पण रोज रोज तीच भजी किती खाणार? भजीच्या व्हरायटीमध्ये भर म्हणून हा नवा पदार्थ तुम्हाला आणि तुमच्या परिवराला नक्की आवडेल.
रोज किती बटाट्याची आणि कांद्याची भाजी खाणार. पालकची तसेच कोबीची भजी तर सगळेच जाणून आहेत. पण या जिभेच्या चोचल्यांना नवीन स्वादाशी भेट घडवून आणण्यासाठी आज मक्यापासून भजी बनवूया. पावसाळ्यात जसे भजी खातात तसे अनेक लोकं मक्याच्या कणसाकडेही वळतात. पण आपण दोघांना एकत्र केले तर पावसाची मज्जा नक्कीच दुप्पट होईल. चला तर मग, जाणून घेऊया मकापासून भजी तयार करण्याची सोपी रेसिपी:
हे सुद्धा वाचा : इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचा विचार करताय? ‘या’ गुणांना करा अंगीकृत
सामग्री:
कृती :
एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ घाला. त्यात बेसन आणि तांदळाचं पीठ मिसळा. मक्याचे दाणे आणि कांदा हे पीठात व्यवस्थित मिसळा. पिठाचं मिश्रण असं तयार करा की ते एकमेकांना चांगले चिकटेल आणि घट्ट होईल. एका तव्यामध्ये किंवा कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल योग्य तापमानाला पोहोचलं आहे की नाही हे तपासण्यासाठी पिठाचा एक छोटा भाग तेलात टाका. जर तो लगेच पृष्ठभागावर आला आणि फुगायला लागला, तर तेल तयार आहे. गरम तेलात चमच्याने हळूवारपणे पिठाचे छोटे गोळे सोडा. पकोडे छोटे-छोटे घ्या आणि तळा, पॅनमध्ये खूप जास्त पकोडे टाकू नका. पकोडे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले कॉर्न पकोडे काढून टिश्यूवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल. त्यानंतर पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचपसह गरमागरम सर्व करा.