फोटो सौजन्य - Social Media
एखादी लहान बैठक असो किंवा मोठा लग्नसोहळा, प्रत्येक ठिकाणी आयोजन, नियोजन तसेच कार्यान्वयन महत्वाचे असते. एखादा कार्यक्रम तेव्हाच मार्गी लागतो जेव्हा त्यावर क्रिएटिव्हिटी तसेच व्यवस्थापन कौशल्याचा चहुबाजूने मारा होतो. प्रत्येक कार्यक्रमाला योग्य नियोजनाची गरज असते, जे इव्हेंट मॅनेजमेंट टीमद्वारे केली जाते. कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था या टीमच्या हातात असते. एखाद्या कार्यक्रमाच्या यशाचे पहिले क्रेडिट इव्हेंट मॅनेजमेंट टीमलाच जाते.
भारतात अनेक लोकं इव्हेंट मॅनेजमेंटच्या या क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर घडवू इच्छुक आहेत. एकंदरीत, इव्हेंट मॅनेजमेंट हा एक असा क्षेत्र आहे ज्यात तुम्ही आपल्या क्रिएटिविटीला आणि व्यवस्थापन कौशल्यांना पूर्णपणे उपयोगात आणू शकता. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन आणि कार्यान्वयन हे या व्यवसायाचे मुख्य कार्य आहे. त्यामुळे, जर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाचे गुण अंगीकृत करणे गरजेचे आहे.
ऑर्गनायजेशन स्किल्स
ऑर्गनायजेशन स्किल्स म्हणजेच नियोजन करण्याचे कौशल्य! एखाद्या कार्यक्रमाचे योग्य ते नियोजन करणे यायला हवे. कार्यक्रमात सगळ्या गोष्टी वेळेवर उपस्थित असणे तसेच योग्य ठिकाणी असणे, या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाची दिशा ठरवतात. एकंदरीत, या गोष्टींचे नियोजन योग्य असेल तर कार्यक्रम योग्य दिशेने जात आहे याची खात्री होते. त्यामुळे, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे नियोजित करण्याची क्षमता हवीच. वेळापत्रक तयार करणे, बुकिंग करणे, आणि सर्वकाही वेळेवर पार पडणे हे तुमच्या व्यवस्थापन कौशल्यांवर अवलंबून असते.
कम्युनिकेशन स्किल्स
इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये विविध प्रकारच्या लोकांशी संवाद साधावा लागतो – ग्राहक, विक्रेते, कर्मचारी, आणि इतर सहभागी. उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या संवादावरून समोरच्या व्यक्तीचे हृदय जिंकता आले पाहिजे. कार्यक्रमात येणारे व्यक्ती खुश असतील तर समजून जा कि तुमचे परिश्रम कामी लागले आहेत. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल फार महत्वाचे असतात.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट
प्रत्येक इव्हेंट हा एक प्रोजेक्ट असतो, ज्यामध्ये वेळ, बजेट आणि संसाधनांचे नियोजन महत्त्वाचे असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स असल्यानं तुम्ही मोठ्या इव्हेंट्सचे व्यवस्थापन सोपं करू शकता. यात प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणे, अडचणी ओळखून त्यांना तत्काळ सोडवणे आणि इव्हेंट वेळेवर यशस्वीरीत्या पूर्ण करणे समाविष्ट आहे.
वेळेचे नियोजन
इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वेळेचे नियोजन हे सर्वात महत्त्वाचे असते. प्रत्येक घटक वेळेत पार पाडण्यासाठी वेळेचा योग्य वापर करण्याची क्षमता असणे अत्यावश्यक आहे. इव्हेंटच्या प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक तयार करणे आणि त्यानुसार सर्वकाही सुनिश्चित करणे हे व्यवस्थापकाचे मुख्य कार्य आहे.
जर तुमच्यात हे सर्व गुण असतील, तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एक यशस्वी करिअर करू शकता. या क्षेत्रात सतत नवनवीन संधी मिळतात, त्यामुळे तुमचं कौशल्य सुधारण्याची आणि यश मिळवण्याची संधीही मिळते.






