Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं थंड पेय पिण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खरबूज पुदिना कूलर बनवू शकता. हे पेय चवीला अतिशय सुंदर लागते.
उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी
उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी
Published on: 
Updated on: 

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वाढत्या गर्मीमुळे अंगाची काहिली होते. सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड वाढते आणि खूप जास्त कंटाळा येतो. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्यामुळे पाण्यासोबतच आवश्यक क्षारांची पातळ सुद्धा कमी होऊन जाते. ज्याचा आरोग्यावर लगेच परिणाम होतो. खूप जास्त घाम आल्यामुळे थकवा, अशक्तपणा येऊन चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड ठेवणे फार आवश्यक आहे. पाणी पिण्यासोबतच वेगवेगळ्या शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांचे सुद्धा सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये 'खरबूज-पुदिना कूलर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे थंड प्यायल्यानंतर शरीरात थंडावा टिकून राहील आणि पाण्याच्या पातळी कायमच संतुलित राहील. या दिवसांमध्ये शरीर ताजेतवाने असणे फार आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात विविध फळे उपलब्ध होतात. या फळांपासून तुम्ही सरबत किंवा कोणतेही मॉकटेल बनवू शकता. चला तयार जाणून घेऊया खरबूज-पुदिना कूलर बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • खरबूज
  • पुदिन्याची पाने
  • बर्फाचे तुकडे
  • लिंबाचा रस
  • मीठ
  • मध किंवा साखर
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर

कृती:

  • खरबूज-पुदिना कूलर बनवण्यासाठी सर्वप्रथम, व्यवस्थित पिकलेला खरबूज स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील बिया काढून खरबूजचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात कापून घेतलेले खरबूज, स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याचे पाने घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून पुन्हा एकदा मिस्करमधून फिरवून घ्या.
  • तुम्हाला एकदम गुळगुळीत पेस्ट हवी असल्यास तयार केलेले मिश्रण चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. यामुळे गर व्यवस्थित पातळ होईल.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे आणि काही पुदिन्याची पाने घालून तयार केलेले सरबत ओतून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्येब बनवलेले खरबूज पुदिना कुलर. हे पेय घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.