
पंचामृत बनवण्याची सोपी कृती
5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु झाला. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये भगवान शंकर आणि विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. तसेच पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करतात.श्रावण महिन्यात केले जाणार उपवास आरोग्य आणि धार्मिकदृष्ट्या फायदेशीर असतात. 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंचामृत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही लगेच हे पंचामृत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पंचामृत बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य-istock)