उपवासाला सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजगिऱ्याचा शिरा
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी अनेक महिला उपवास करतात. श्रावणात केलेला उपवास आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर असतो. तसेच या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन इत्यादी अनेक सण असतात. त्यामुळे सण आणि उपवासाच्या दिवशी नेमकं काय बनवावं हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. उपवासाच्या दिवशी साबुदाणा आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर आरोग्यसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोजक्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळात राजगिऱ्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शिरा उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी खाल्ल्यानंतर पोटही भरेल आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील.(फोटो सौजन्य-istock)






