Tamarind Thecha: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये बनवा कच्च्या हिरव्या चिंचेचा चटपटीत ठेचा

Tamarind Thecha: लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिंच खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे कच्च्या चिंचांपासून झटपट तुम्ही आंबट तिखट ठेचा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
tamarind Thecha: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये बनवा कच्च्या हिरव्या चिंचेचा चटपटीत ठेचा
tamarind Thecha: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये बनवा कच्च्या हिरव्या चिंचेचा चटपटीत ठेचा
Published on: 
Updated on: 

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळी फळे आणि भाज्या उपलब्ध होतात. हिरव्यागार पालेभाज्या, गाजर, मुळा, आवळे इत्यादी पदार्थ पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवरत नाही. आंबट गोड चवीची कच्ची चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वर्षभर बाजारात पिकलेली चिंच मिळतात, पण थंडीला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कच्ची चिंच उपलब्ध होतात. याच हिरव्यागार चिंचांपासून तुम्ही झटपट ठेचा बनवू शकता. चिंचेचा ठेचा चवीला अतिशय सुंदर लागतो. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत चिंच ठेचा अतिशय सुंदर लागतो. हा ठेचा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. जेवणात तोंडी लावण्यासाठी भाजी नसेल तर तुम्ही कच्च्या चिंचेचा ठेचा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कच्च्या चिंचेचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • कच्ची चिंच

  • हिरवी मिरची

  • गूळ

  • तेल

  • मोहरी

  • हिंग

  • जिरं

  • मीठ

कृती:

  • चिंचेचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिंच पाण्याने स्वच्छ धुवून तुकडे करा.

  • त्यानंतर चिंच बारीक कापून घ्या.

  • मिक्सरच्या भांड्यात चिंचेचा बारीक तुकडे आणि हिरव्या मिरच्या घालून जाडसर बारीक वाटून घ्या.

  • चिंच जास्त बारीक वाटू नयेत. त्यानंतर त्यात गूळ, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.

  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात हिंग, मोहरी, जिरं आणि वाटून घेतलेले मिश्रण घालून मंद आचेवर मिक्स करा.

  • तयार आहे आंबट तिखट कच्च्या चिंचेचा ठेचा.