कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी
राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. पावसाळ्यात डोळे आणि कानाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागतो. अनेक लोक कानांच्या संसर्गाने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्यात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार आणि इतर संसर्ग वाढण्याची भीती असते. वातावरणातील ओलावा आणि आद्र्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अंघोळ केल्यानंतर किंवा भिजून आल्यानंतर कान स्वच्छ पुसेल नाही तर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. कानामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. रोग आणि संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील आद्र्रता आणि पाऊस आणि कानामध्ये असलेले पाणी. कानामध्ये बराच वेळ पाणी तसेच राहिल्यामुळे आणि कानामध्ये ओलावा असल्याने संसर्ग वाढू लागतात. सायनस इन्फेक्शन, ओटिटिस मीडियासारख्या समस्या वाढू लागतात.
हे देखील वाचा: शरीरात जाणवते विटामिन डी ची कमतरता? मग आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.