आहारात करा 'या' ड्रिंक्सचा समावेश
शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी,अपुरी झोप, वातावरणातील बदल इत्यादींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीर कमकुवत होण्यास सुरुवात होते. शरीरात विटामिन डी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर हाडे दुखणे, नैराश्य, स्नायू दुखणे, थायरॉईड, कमकुवत प्रतिकारशक्ती, केस गळणे, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. शरीरामध्ये जीवनस्तवांची कमतरता जाणवू लागल्यानंतर अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पोषक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
संत्र्यामध्ये विटामिन डी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात संस्त्र्याच्या रसाचा समावेश करावा. संत्र्यामध्ये असलेले विटामिन सी, डी त्वचा रंग सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे नियमित किंवा आठवड्यातून तीनदा संस्त्र्याच्या रसाचा आहारात समावेश करावा.
हे देखील वाचा: हाय ब्लड प्रेशर रुग्ण करू शकतात का रक्तदान ? जाणून घ्या उत्तर
आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
गाईच्या दुधामध्ये विटामिन डी, कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात जाणवत असलेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात नियमित एक ग्लास गाईचे दूध प्यावे. गाईचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
गाजरमध्ये विटामिन डी मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे डोळे, त्वचा आणि रोगप्रतीकशक्ती मजबूत होण्यास मदत होते. गाजराचा रस प्यायल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही गाजराचा रस बनवू शकता.
हे देखील वाचा: लठ्ठपणापासून होईल लवकर सुटका, जाणून घ्या फिटनेसचे 6 नियम
आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
नियमित ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. ताकामध्ये विटामिन डी आढळून येते, जे शरीर थंड ठेवते. त्यामुळे रोजच्या आहारात ताकाचा समावेश करा.