तिशीनंतर पुरूषांनी कशी घ्यावी आरोग्याची काळजी
स्त्रिया असो की पुरुष, प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी आपली दिनचर्या योग्य ठेवली पाहिजे. खरे तर वयाच्या 30 वर्षानंतर आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण याच वयात शारीरिक आणि मानसिक बदल झपाट्याने होतात, ज्याचा भविष्यात आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पण या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतात जेव्हा तुम्ही निरोगी पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवता.
निरोगी राहण्यासाठी जंक फूडपासून दूर राहा. योगासनांकडे लक्ष द्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर 30 वर्षांच्या वयानंतर पुरुषही निरोगी राहू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्या पुरुषांनी पाळल्या पाहिजेत, यासाठी फिटनेस फ्रिक भाग्यश्री मोरे यांनी काही टिप्स दिल्या आहेत (फोटो सौजन्य – iStock)
हेल्दी डाएटचा करा समावेश
हेल्दी डाएट करणे आहे गरजेचे
वयाच्या 30 वर्षानंतर पुरुषांनी जंक फूडपासून दूर राहावे. निरोगी आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण निरोगी जीवनशैली आणि पोषक तत्वांनी युक्त आहार तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करेल. आजार सोडा, म्हातारपणदेखील तुम्हाला शिवणार नाही. हेल्दी डाएटमध्ये तुम्ही डाएटिशियन वा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पदार्थांचा समावेश करून खा
व्यायामाचे रूटीन ठरवा
व्यायामासाठी योग्य रूटीन ठरवा
व्यायामामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारेल. योगासने, चालणे, सायकल चालवणे किंवा व्यायामशाळेत व्यायाम करणे यासारखे कोणतेही व्यायाम रोज किमान 30 मिनिटे केले पाहिजेत. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतील. तणावही कमी होईल. आजारपण तुमच्यापासून दूर राहतील आणि स्ट्रमिनाही अधिक राहील
शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश
8 तास झोप गरजेची
झोप पूर्ण करणे आवश्यक आहे
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. पण आजकाल लोक रात्री स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर खोलवर परिणाम तर होतोच शिवाय तणावही वाढतो. त्यामुळे रोज किमान आठ तासांची झोप घ्या. यामुळे शरीराला आराम तर मिळेलच पण मनही चांगले काम करेल.
व्यसनांपासून रहा दूर
कोणतेही व्यसन करणे टाळा
जर तुम्हाला दारू पिण्याची आणि धुम्रपानाची सवय असेल तर तुम्ही त्यापासून ताबडतोब दूर राहावे. या सवयी केवळ शारीरिक आरोग्यासाठीच हानिकारक नसून मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. यामुळे हृदयविकार, यकृताच्या समस्या आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. ही व्यसनं पुरूषांना अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते त्यामुळे वेळीच यापासून दूर व्हा
पुरुषांच्या शरीरात खरा Stamina आणि उत्साह भरेल हे फळ, मुळापर्यंत पोहचेल विटामिन, सळसळेल रक्त
नियमित तपासणी
आरोग्याची नियमित तपासणी करावी
स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाने वयाच्या 30 वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने कोणताही संभाव्य आजार त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधला जाऊ शकतो आणि त्यावर वेळीच उपायही करता येतो त्यामुळे वयाच्या तिशीनंतर तुम्ही संपूर्ण बॉडी चेकअप करणे अत्यंत गरजेचे आहे.
30 नंतर पुरुषांना होणाऱ्या समस्या
तिशीनंतर होणारे आजार
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.