Food For Stamina In Men: सध्या चुकीची खाण्याची पद्धत आणि दिवसरात्र काम यामुळे पुरुषांमधील स्टॅमिना वा ताकद कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे अनेकदा पुरूषांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक पदार्थांमध्ये स्टॅमिना वाढवण्याची ताकद असते. मात्र आवळा हे असेच एक फळ आहे जे तुमचे तारुण्य परत आणू शकते आणि तुमच्या शरीरातील Stamina टिकवू शकते. आवळा हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि अनेक रोगांपासून संरक्षण करते. आवळा तुम्ही कच्चे खाऊ शकता किंवा ज्यूस बनवून पिऊ शकता किंवा त्याचे लोणचे करूनही खाऊ शकता. कसा होतो फायदा याबाबत गायनोकॉलॉजिस्ट डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य - iStock)
म्हातारपणापासून शरीराला दूर ठेवण्यासाठी फळे खावीत. पण आवळा हे असे एक फळ आहे जे जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. हे डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर तरुण ठेवते. हे खाल्ल्याने तुम्हाला हे अविश्वसनीय फायदे मिळू शकतात
आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी केस आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. आवळा खाल्ल्याने रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन वाढतो ज्यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट केस मजबूत आणि चमकदार बनवतात. त्यामुळे केस गळण्याची समस्याही कमी होते. पोषणाच्या कमतरतेमुळे केसांचे प्रमाण कमी झाले असेल तर केस पुन्हा वाढण्यास मदत मिळते
संशोधनानुसार आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली प्रतिकारशक्ती वाढवते. हे शरीराला जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला सर्दी आणि इतर संक्रमणांपासून संरक्षण मिळते. आवळा हा अनेक रोगांपासून आपल्याला दूर ठेवतो
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी हे उपयुक्त आहे. तसंच पुरूषांमधील स्टॅमिना यामुळे वाढण्यास मदत मिळते
आवळा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. हे रक्तदाब देखील नियंत्रित करते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे नियमित आवळ्याचे सेवन करावे
आवळा चयापचय वाढवते आणि भूक नियंत्रित करते. जे वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे त्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. तुम्ही आहारात आवळ्याचा समावेश करून घेऊ शकता आणि त्याचे नियमित सेवन करावे