Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरोदरपणात कशी घ्याल सांध्याच्या आरोग्याची काळजी, तज्ज्ञांचे मत

गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. बाळाला जन्म देणे हा 9 महिन्यांचा जितका भावनिक सुखद काळ असतो तितकाच शारीरिकदृष्ट्या त्रासदायक काळ असतो. या दरम्यान अनेक महिलांना सांधेदुखी सुरू होते. मात्र याबाबात अधिक माहिती आपल्याला तज्ज्ञांनी दिली असून ती प्रत्येक महिलेने जाणून घेणं गरजेचे आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2024 | 01:16 PM
गरोदरपणातील सांधेदुखी

गरोदरपणातील सांधेदुखी

Follow Us
Close
Follow Us:

गर्भधारणेदरम्यान ऑर्थोपेडिक समस्या दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. केवळ मधुमेह, उच्चरक्तदाब, मळमळ किंवा उलट्याच नाही तर अनेक स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होतो किंवा गर्भधारणेदरम्यान पायाला सूज येते.

गर्भधारणेच्या या प्रवासात सांध्याच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि स्त्रियांना भविष्यात सांधेदुखीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. डॉ. अलोक पांडे, ऑर्थोपेडिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखातून सांगितल्या आहेत. त्या प्रत्येक महिलेने गरोदरपणात जाणून घेतल्या पाहिजेत. यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही स्वतःची काळजी घेणं सोपं होतं. (फोटो सौजन्य – iStock) 

कंबरदुखी 

बाळाच्या जन्मादरम्यान शरीर मोठ्या प्रमाणात रिलॅक्सिन हार्मोन्स तयार करते, जे प्रसुतीसाठी तुमच्या पेल्विक क्षेत्रातील अस्थिबंधन मऊ होण्यास मदत करतात. परिणामी तुमच्या नितंबाच्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते. या वेदना दैनंदिन कामात व्यत्यय आणतात. यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

हेदेखील वाचा – गरोदर महिलांसाठी किती फायदेशीर ठरतो योग? गायनॅकने सांगितले महत्त्व

पाठीच्या खालच्या भागातील वेदना

गरोदरपणातील कंबरदुखीचा त्रास, खालच्या भागात दुखणे

तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते जे कधीकधी खुप त्रासदायक ठरु शकते. सततच्या वेदनांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि तुम्हाला चिडचिडही होईल. त्यामुळे योग्य स्थितीत झोपणे अथवा हा त्रास होऊ नये म्हणून स्वतःच काळजी घ्यावी लागते. 

पाय सुजणे

पायाला सूज येणे

शरीराच्या ऊतींमध्ये द्रव तयार झाल्यामुळे ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे  महिलांसाठी चालतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक महिलांना अगदी 4 थ्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत पायाची सूज राहते आणि त्याचा त्रासही होतो. अशावेळी नेहमी पायाखाली उशी घेऊन झोपल्यास त्रास कमी होतो

कार्पल टनल सिंड्रोम

हे बहुतेक वेळा तिसऱ्या तिमाही दिसून येते आणि त्यामुळे बोटे आणि हातामध्ये बधीरपणा, वेदना आणि मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसतात. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तर हे गरोदरपणामध्ये अत्यंत कॉमन आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्या आणि काही अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

हेदेखील वाचा – गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक

गरोदरपणात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

गरोदरपणात काय काळजी घ्यावी

  • गरोदर महिलांनी हलके व्यायाम करावा.  डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसेच फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा
  • चालणे हा एक उत्तम व्यायाम पर्याय ठरु शकतो
  • सलग काम करु नका थोड्या थोड्या अंतराने ब्रेक घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या
  • बसून झोपणे टाळा. नितंबाच्या आणि पाठीवरच्या स्नायुंवरील दबाव कमी करण्यासाठी खाली वाकताना, बसताना, काम करताना, एखादी वस्तू उचलताना विशेष काळजी घ्या
  • हाडांच्या मजबूतीसाठी तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार कॅल्शियम सप्लिमेंट घ्या. शिवाय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली वजन उचलण्याचे व्यायाम किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने हाडांची घनता वाढण्यास मदत होऊ शकते
  • शरीर हायड्रेटेड राखणे आणि पुरेसे पाणी पिणे हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. गर्भवती महिलांनी त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी

Web Title: How to take care of joints pain health during pregnancy expert opinion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 01:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.