हेपेटायटिस बी चा धोका कोणाला
हेपेटायटिस हा यकृताचा एक दाह असून तो हेपटायटस विषाणूमुळे होतो. हा कोणत्याही वयात होऊ शकते, लहान मुलांना याचा सर्वात जास्त धोका असतो. उपचार न केल्यास, यामुळे आरोग्याविषयक गुंतागुंतीचा धोका वाढतो, तर काही प्रकरणांमध्ये यकृत रोगाचा सामना करावा लागू शकतो.
परिणामी यकृत निकामी होऊन यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. लसीकरणाद्वारे हेपेटायटिसला प्रतिबंध करता येऊ शकतो याकरिता पालकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. प्रभावी रोग नियंत्रणासाठी मुलांना वेळीच लसीकरण करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हेपेटायटिस व्हायरस म्हणजे काय
हेपेटायटिसचा धोका कोणाला
यकृत हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे आणि तो अनेक पाचक, चयापचयासंबंधीत आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य करतो. व्हायरल हेपेटायटिस हे सर्वात सामान्यपणे आणि विषाणूंच्या समूहामुळे होते, ज्याला एकत्रितपणे हेपेटायटीस व्हायरस म्हणतात.
हेपेटायटिसचे प्रकार
हेपेटायटीसचे पाच प्रकार आहेत – ए, बी, सी, डी आणि ई. हेपेटायटीस ए जेव्हा हेपेटायटीस ए असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मलाशी संक्रमित दूषित अन्नाचे सेवन करतो किंवा पाणी पितो तेव्हा हेपेटायटीस ए दिसून येते.
योनीतून द्रव आणि रक्त आणि प्रसूती दरम्यान आईकडून नवजात बाळास संक्रमित केले जाऊ शकते. संक्रमित व्यक्तीने वापरलेले इंजेक्शन आणि असुरक्षित संभोग केल्याने हेपेटायटीस बी ला आमंत्रण दिले जाऊ शकते. जेव्हा एखाद्याचा हेपेटायटीस सी विषाणूचा संसर्ग झालेल्या दुसर्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो. तेव्हा हेपेटायटीस सी होतो. रक्त, लाळ, वीर्य आणि योनिमार्गासारख्या संसर्गजन्य शरीरातील द्रव शरीराच्या ऊतींशी संपर्क साधतात तेव्हा हेपेटायटीस डी चा प्रसार होतो. हेपेटायटीस ई मलाद्वारे संक्रमित होतो किंवा आपण पीत असलेले पाणी किंवा पीडित असलेल्याच्या मलशी संपर्कात आलेली एखादी वस्तू खाल्ल्यास संक्रमण होऊ शकते.
काय आहेत हेपेटायटिस बी ची लक्षणे
काय आहेत हेपेटायटिसची लक्षणे
थकवा, मळमळ, उलट्या, पोटदुखी, भूक न लागणे, गडद लघवी होणे, सांधेदुखी, त्वचा पिवळसर होणे, सांधेदुखी हे हेपेटायटीसची लक्षणे आहेत. गर्भवती महिलांमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता तसेच कोमॅार्बिडीटीज असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग गंभीर रुप धारण करु शकतो. हिपॅटायटीस बी शरीरातील द्रव (उदा., वीर्य, योनीतून स्राव, लाळ) लैंगिक संपर्काद्वारे किंवा जन्माच्या वेळी आईकडून बाळाला त्याची लागण होण्याचा धोका असतो अशी प्रतिक्रिया डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन,पुणे
हेदेखील वाचा – व्हायरल हेपेटायटीस विषाणू संक्रमित होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी
अतिरिक्त लक्षणे
डॉ. सेनगुप्ता पुढे सांगतात की, हिपॅटायटीस बी, सी आणि डी संसर्गामुळे थकवा, ताप, अस्वस्थता, भूक न लागणे आणि यकृताच्या कार्यातील बिघाड अशी लक्षणे आढळून येऊ शकतात. यापैकी काही लिव्हर सिऱ्होसिस नावाच्या धोकादायक आजारात रुपांतरीत होऊ शकतात ज्यामध्ये यकृताचे नुकसान होते तर काही वेळस त्याची यकृताच्या कर्करोगात प्रगती होते.
कसा होतो हा संसर्ग
हा संसर्ग ओटीपोटात पसरुन, उदर पोकळी [जलोदर] मध्ये द्रव गोळा करते, यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये रक्तस्त्राव आणि कुपोषण, हार्मोनल असंतुलन आणि मेंदूच्या कार्यात बिघाड दिसून येतो. यकृत निकामी झाल्याने जीवनाचा गुणवत्ता खराब होते आणि ही स्थिती बऱ्याचदा केवळ यकृत प्रत्यारोपणाने व्यवस्थापित केली जाऊ शकते. यकृताचा आजार असलेल्या मुलांना सतत वेदना, वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागणे आणि शिक्षणातील अडथळा यामुळे तणाव, एकाकीपणा, चिंता आणि नैराश्य येते. हिपॅटायटीस बी, सी आणि डी नवजात शिशु ते प्रौढ व्यक्तींपैकी कोणालाही होऊ शकते.
लसीकरण महत्त्वाचे
लसीकरणाला अधिक महत्त्व द्यावे
हेपेटायटिस बी लस ही हेपेटायटिस बी या विषाणूमुळे यकृताला होणारा संसर्ग रोखण्यासाठी दिली जाते. या विषाणूमुळे यकृताला तीव्र संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे यकृताचा सिर्होसिस, कर्करोग होऊ शकतो तसेच मृत्यूही ओढावू शकतो.बाळाचा जन्म झाल्यावर ही लस जितक्या शक्य तितक्या लवकर, 24 तासांच्या आत 0.5 मिली इतकी द्यावी असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. या लशीचे नंतर दोन ते तीन डोस दिले जातात.
या लशीमुळे 20 वर्षे संरक्षण मिळते आणि बहुतेक आयुष्यभर तिचा उपयोग होतो. हेपेटायटीस लसीकरण हे संभाव्य जीवघेण्या आजारा विरुद्ध प्रभावीपणे काम करतात ज्यामुळे लिव्हर सिऱ्होसिस आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो. हे लसीकरण शाळा आणि प्लेग्रुपमध्ये संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया डॉ. सेनगुप्ता यांनी व्यक्त केली.
वेळीच निदान आवश्यक
यावर्षी 6 ते 14 वर्षे वयोगटातील 20-25 मुलांना ओटीपोटात वेदना, उलट्या, कावीळ, अशक्तपणा आणि हेपेटोमेगली (यकृत आणि प्लीहा सामान्यपेक्षा आकाराने जास्त फुगल्याचा विकार) अशा प्रमुख तक्रारी जाणवत असल्याने पालकांनाी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पालकांनी मुलांमध्ये हिपॅटायटीसचे वेळीच निदान करणे सुनिश्चित केले पाहिजे.
यकृताचे निकामी झाल्यास यकृत प्रत्यारोपण ची आवश्यकता भासते. ही स्थिती टाळण्यासाठी, तुमच्या मुलांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे. हिपॅटायटीस सी, डी आणि ई प्रकारांविरूद्ध कोणतीही लस उपलब्ध नाही. शिवाय मुलांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावणे गरजेचे आहे.हिपॅटायटीसचे वेळेवर निदान आणि व्यवस्थापन केल्यास मुलांना निरोगी आयुष्य जगता येईल अशी प्रतिक्रिया डॉ. जितेंद्र गांधी, (बालरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे) यांनी व्यक्त केली.
संसर्गाचा धोका बाळांना
हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. या सर्व प्रकारांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी संसर्गाचा उच्च धोका असतो. गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हिपॅटायटीस बी संसर्गाचा धोका अधिक असतो. हेपेटायटीस बी हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे यकृताला सूज येते. हेपेटायटीस बी विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे, असुरक्षित शारीरिक संबंध, संक्रमित व्यक्तीच्या टूथब्रश तसेच इंजेक्शनचा वापर, टॅट्टू च्या माध्यमातून प्रवेश करतो. हिपॅटायटीस बी गर्भवती महिलेकडून तिच्या नवजात बाळामध्ये देखील संक्रमित होऊ शकतो अशी प्रतिक्रिया डॉ. स्वाती गायकवाड(प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, पुणे) यांनी व्यक्त केले.
संसर्गामुळे होऊ शकते गुंतागुंत
डॉ. गायकवाड पुढे सांगतात की, गर्भधारणेदरम्यान हिपॅटायटीस बी संसर्गामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो. तसेच, जन्माला आलेल्या बालकांचे वजन कमी असण्याची शक्यता असते. हा संसर्ग गर्भधारणेदरम्यान झाला तर मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्हाला ते रोखायचे असेल तर बाळाचा जन्म होताच तुमच्या बाळाला हेपेटायटीसचे लसीकरण करा.
जन्मानंतर एक महिन्यानंतर बाळाला पुन्हा लसीकरण करणे आवश्यक आहे. यानंतर, पुन्हा दोन महिन्यांनी आणि नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लसीकरण करा. प्रत्येक गर्भवती महिलेची हिपॅटायटीस बी आणि सी साठी तपासणी केली पाहिजे. हिपॅटायटीस बी लस गर्भधारणेपूर्वी दिली पाहिजे. ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, हातपाय खाजवणे किंवा काविळीची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.